मराठी पाट्या नसल्यास कारवाई कामगार उपायुक्त अभय गिते यांचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी पाट्या नसल्यास कारवाई
कामगार उपायुक्त अभय गिते यांचा इशारा
मराठी पाट्या नसल्यास कारवाई कामगार उपायुक्त अभय गिते यांचा इशारा

मराठी पाट्या नसल्यास कारवाई कामगार उपायुक्त अभय गिते यांचा इशारा

sakal_logo
By

लोणावळा, ता. २७ ः दुकाने आणि आस्थापनांवर मराठी पाट्या लावण्याची कारवाई अधिक तीव्र करत मराठी पाट्या न लावणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कामगार उपायुक्त अभय गिते यांनी दिला आहे. दुकाने व आस्थापनांवरील पाट्या मराठीत असाव्यात, असे आवाहन गिते यांनी केले आहे.
दुकाने व आस्थापनांवरील पाट्या मराठीत असाव्यात, यासाठी शासनाच्यावतीने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे आणि सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम २०२२ तील कलम ३६ ‘क’ (१) च्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनाला लागू असलेल्या कलम ७ नुसार मराठी भाषेत नामफलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मालक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपीबरोबरच इतर भाषेतही लिहू शकतो. मात्र मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे. मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये. ज्या आस्थापनेत कोणत्याही प्रकारे मद्यविक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल अशा आस्थापनेस महापुरुष/ महनीय महिला यांची किंवा गड-किल्ल्यांची नावे देण्यात येऊ नयेत, असा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या नियमांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे चित्र आहे. या संदर्भात शासनाकडे तक्रारीही मिळत आहेत. या संदर्भात पुणे विभागाचे कामगार उपायुक्त अभय गिते म्हणाले, ‘‘मराठी पाट्या लावण्यासाठी शासनाने कायदा केला आहे. कारवाई न करता मराठीत बोर्ड लावण्यासाठी दुकानदारांना
दुकाने - आस्थापने कार्यालयांवर मराठी नामफलक लावण्यासाठी मुदत देण्यात आली होती. तरीही दुर्लक्ष होत आहे. दुकाने- आस्थापने कार्यालयांवर मराठी नामफलक लावण्याची कार्यवाही होत असल्याबाबतची पाहणी पालिकेच्या दुकाने व आस्थापने विभागाकडून पुणे जिल्ह्यात तपासणी करण्यात येत आहे. निरीक्षणावेळी मराठीत बोर्ड लावण्यास नकार देणाऱ्या दुकानदारांवर न्यायालयीन कारवाई केली जाईल. जर दुकानदार कोर्टाच्या कार्यवाहीपासून वाचला तर त्याला दंड आकारण्यात येईल, असा इशारा गिते यांनी दिला.

लोणावळा परिसरात तक्रारी
पुणे जिल्ह्यातील विशेषतः लोणावळा परिसरात मराठी पाट्या नसल्याच्या तक्रारी शासनाकडे मिळाल्या आहेत. लोणावळा व खंडाळा ही महत्वाची पर्यटनस्थळे आहेत. मोठ्या संख्येने पर्यटक याठिकाणी येत असतात. अनेक नामांकीत हॉटेल्स आणि रिसॉर्टस, संस्था, चिक्की दुकाने शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी आहेत. त्यामुळे याठिकाणी कारवाईस महत्व प्राप्त झाले आहे. तक्रारी वाढत असल्याने दुकाने व आस्थापना निरीक्षकांकडून तपासणी सुरु करण्यात आली आहे. कारवाई व दंड टाळण्यासाठी दुकाने व आस्थापनांवरील पाट्या या नियमानुसार असाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Lon22b01413 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..