लोणावळ्यातील भुशी धरणात तरुण बुडाल्याची भीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणावळ्यातील भुशी धरणात
तरुण बुडाल्याची भीती
लोणावळ्यातील भुशी धरणात तरुण बुडाल्याची भीती

लोणावळ्यातील भुशी धरणात तरुण बुडाल्याची भीती

sakal_logo
By

लोणावळा, ता. ११ : येथील पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण असलेले भुशी धरणात सोमवारी (ता. ११) दुपारी पोहण्यासाठी उतरलेला मुंबईतील तरुण बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे.

साहिल सरोज (वय १९, रा. मुंबई) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल हा सहकाऱ्यांसह लोणावळा व खंडाळ्यात वर्षाविहार व पर्यटनासाठी आले होते. दुपारी सर्व सहकारी हे भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या धबधब्याकडे भिजण्यासाठी गेले होते. यावेळी धबधब्याच्या मोठ्या प्रमाणात वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातून येताना साहिलचे नियंत्रण सुटल्याने तो वाहून गेला. त्याच्या सहकाऱ्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या वतीने शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी करत शोध सुरू केला. लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले आहे.
------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Lon22b01432 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top