लोणावळ्यामध्ये मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणावळ्यामध्ये मुलाचा 
विजेच्या धक्क्याने मृत्यू
लोणावळ्यामध्ये मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

लोणावळ्यामध्ये मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

sakal_logo
By

लोणावळा, ता. २९ः जलतरण तलावालगतच्या विजेच्या खांबाला हात लागल्याने पर्यटनासाठी आलेल्या १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. गुरुवारी (ता. २८) रात्री साडेआठच्या सुमारास तुंगार्ली येथील क्रेसेंन्ट व्हिला येथे ही घटना घडली. हरुन मसुद वाली (वय-१३, रा. मुंबई) असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी मोहमद साजीद खान (वय-५६, रा. भायखळा, मुंबई) यांनी पोलिसांत खबर दिली. मोहमद खान हे पत्नी, सासरे, मेहुणी, साडू व मुलांसह लोणावळ्यात पर्यटनासाठी आले होते. तुंगार्ली येथील क्रेसेंन्ट व्हिला या बंगल्यात त्यांचे वास्तव्य होते. रात्री साडेआठच्या सुमारास खान व त्यांच्या साडूची मुले तलावात पोहत होती. त्यावेळी हरुन याचा तलावाशेजारील विजेच्या खांबास हात लागला. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्याला तातडीने येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.मात्र, डाॅक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

Web Title: Todays Latest Marathi News Lon22b01443 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..