कुसगावच्या ग्रामस्थांची राबविली लोकचळवळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुसगावच्या ग्रामस्थांची राबविली लोकचळवळ
कुसगावच्या ग्रामस्थांची राबविली लोकचळवळ

कुसगावच्या ग्रामस्थांची राबविली लोकचळवळ

sakal_logo
By

लोणावळा, ता. २ : वृक्ष संवर्धनासाठी कुसगाव बुद्रुक ग्रामस्थांनी लोकचळवळ सुरू सुरू केली आहे. ग्रामपंचायत, वृक्ष संवर्धन समिती आणि लोकसहभागातून कुसगाव बुद्रुक येथील आदिवासी वस्तीवर पूर्ण वाढ झालेल्या तीनशे वृक्षांचे रोपण करण्यात आले.
कुसगावच्या सरपंच अश्विनी गुंड, उपसरपंच सूरज केदारी, सदस्य राजेश काटकर, गणेश गुंजाळ, फरीन शेख, मंदाकिनी झगडे, शैला मोरे, सुजाता ठुले, वर्षा कडू, शारदा देवाडे, अश्विनी ठुले, वृक्षसंवर्धन समितीचे अध्यक्ष शिवाजी गाडे, उद्योजक रणजित काकडे, नीलेश गराडे, नीलेश ठोंबरे, मंगेश ठोंबरे, अंकुश गुंड, राजू येवले, सुनील पंडित, रवी शिर्के, मधुकर कडू, किसन गुंड, ग्रामपंचायत कर्मचारी, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
येथील आदिवासी वस्तीवर झाडांसाठी ग्रामस्थांच्या वतीने यापूर्वीच खड्डे घेण्यात आले होते. उद्योजक रामदास काकडे, वृक्षसंवर्धन समिती, कुसगाव बु. ग्रामपंचायत यांच्या सौजन्याने पाच ते सहा फूट उंचीची आंबा, फणस, बदाम, जांभूळ, सिसम, करंज, काशीद पोट्रोफार्म आदी जातीची तीनशे झाडे लावण्यात आली. झाडे जगविण्याची गरज आहे. देशी लागवडीची झाडे लावल्यामुळे नागरिकांना व भावी पिढीला चांगली फळे खायला मिळतील, अशी आशा उद्योजक रणजित काकडे यांनी व्यक्त केली.
वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग आणि लोकचळवळ उभी करण्यात येत आहे. वृक्ष संवर्धनासह जंगलाला लागलेले वणवे विझवणे तसेच वणवा निर्मूलनासाठीही गावातील युवकांनी पुढाकार घेतला आहे, असे वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांनी सांगितले.

निसर्गाचे संवर्धन समाजाचे कर्तव्य
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षी ही सुस्वरे आळविती।।’ असे संत तुकाराम महाराजांनी समाजाला अभंगातून सांगितले आहे. त्यात निसर्गाला आपण आपले सगेसोयरे, मित्र मानले पाहिजे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी त्याला पोषक असलेले वातावरण निर्माण करणे, समाजातील प्रत्येकाचे काम आहे. त्यात वृक्षारोपण हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. केवळ वृक्षांची लागवड करून उपयोग नाही, त्यांचे संवर्धनही महत्त्वाचे आहे. म्हणजे लावलेले रोपांचे मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर होईपर्यंत त्याचे जतन करणे हे समाजाचे काम आहे. त्यामुळे निसर्गाशी सर्वांनी नाते जपले पाहिजे.

छायाचित्र: LON22B01871/1872

Web Title: Todays Latest Marathi News Lon22b01453 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..