
अमृत महोत्सवनिमित्त लोणावळ्यात शुक्रवारी ‘हर घर तिरंगा’ फेरी
लोणावळा, ता. ३ : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, लोणावळ्यात शुक्रवारी (ता. ५) हर घर तिरंगा अभियान फेरीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी दिली. सकाळी दहा वाजता येथील मावळा पुतळ्यापासून या रॅलीस सुरुवात होणार असून, नगर परिषद कार्यालय येथे समारोप होईल. लोणावळ्यातील सर्व शाळा या रॅलीत सहभागी होणार आहे.
नागरिकांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम राहावी या उद्देशाने ‘आजादी का अमृत महोत्सव’ देशभरात हर घर तिरंगा झेंडा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यानिमित्ताने नगरपरिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, देशभक्तिपर समूहगीत, देशभक्तिपर, स्फूर्तीगीत वैयक्तिक गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (ता. १०) पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी देशभक्तिपर गीतांवर आधारित समूहगीत गायन, शुक्रवारी (ता. १२) पाचवी ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी देशभक्ती आणि स्फूर्तिगीत गायन स्पर्धा, माझा आवडता क्रांतिकारक-स्वातंत्र्यसैनिक, स्वातंत्र्य संग्रामातील प्रसंग-घटना, स्वातंत्र्यानंतरची पंच्याहत्तर वर्षे, आधुनिक भारत या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत लोणावळा नगर परिषदेच्या शाळा क्रमांक एक येथे या स्पर्धा झाली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Lon22b01455 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..