हर घर तिरंगा ः लोणावळा नगरपरिषद व पोलिस दलाकडून आयोजन रॅलीत हजारो विद्यार्थी सहभागी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर घर तिरंगा ः लोणावळा नगरपरिषद व पोलिस दलाकडून आयोजन
रॅलीत हजारो विद्यार्थी सहभागी
हर घर तिरंगा ः लोणावळा नगरपरिषद व पोलिस दलाकडून आयोजन रॅलीत हजारो विद्यार्थी सहभागी

हर घर तिरंगा ः लोणावळा नगरपरिषद व पोलिस दलाकडून आयोजन रॅलीत हजारो विद्यार्थी सहभागी

sakal_logo
By

लोणावळा, ता. ६ ः स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त लोणावळा नगरपरिषद व पोलिस दलाच्यावतीने आयोजित ‘हर घर तिरंगा’ अभियान रॅलीत लोणावळ्यातील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘आजादी का अमृत महोत्सव’  ‘हर घर तिरंगा झेंडा’ अभियान राबविण्यात येणार आहे.
या अभियानाच्या जनजागृतीसाठी लोणावळा नगरपरिषद, शहर पोलिस स्टेशन व महिला पोलिस प्रशिक्षण केंद्र खंडाळा यांच्यावतीने ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌आयोजित जनजागृती रॅलीत सर्व शाळांनी सहभाग नोंदविला. सुमारे दोन हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. ‘हर घर तिरंगा’ जनजागृती रॅलीला लोणावळ्यातील मावळा पुतळा चौकातून सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप झाला. विद्यार्थ्यांनी या रॅलीत देशभक्तीपर घोष वाक्य संदेश फलक हातात घेत देशभक्तीपर घोषणा दिल्या.
मुख्याधिकारी पंडित पाटील, महिला पोलिस प्रशिक्षण केंद्राचे उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित पाटील, शहर पोलिस निरीक्षक सीताराम डुबल, लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, ब्रिंदा गणात्रा, निखिल कविश्वर, राजकीय पक्षांचे आजी माजी पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी, सामाजिक संस्थाचे पदाधिकारी सहभागी झाले. रॅलीच्या समारोपाच्या ठिकाणी उपस्थित नागरिकांना घरावर तिरंगा झेंडा कसा लावावा, झेंड्याची लांबी- रुंदी किती असावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ज्या नागरिकांना झेंडे हवे असतील, त्यांना नगरपरिषद ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर झेंडे उपलब्ध करून देणार असल्याचे मुख्याधिकारी पंडित पाटील म्हणाले.


छायाचित्रे 01879/1880/1881
लोणावळा: हर घर तिरंगा अभियान रॅलीत देशभक्तीपर घोषवाक्य फलक हाती घेत हजारो विद्यार्थी सहभागी झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Lon22b01457 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..