लोणावळ्यात १८ शाळांना शालेय साहित्याचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणावळ्यात १८ शाळांना
 शालेय साहित्याचे वाटप
लोणावळ्यात १८ शाळांना शालेय साहित्याचे वाटप

लोणावळ्यात १८ शाळांना शालेय साहित्याचे वाटप

sakal_logo
By

लोणावळा, ता. ६ : बंध मैत्रीचे व निर्मिती फाऊंडेशनच्यावतीने १८ शाळांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. येथील सामाजिक कार्यकर्त्या व निर्मिती फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सीमा शिंदे यांनी याबाबत पुढाकार घेतला. कुसगाव बुद्रूक विभागातील जिल्हा परिषदेच्या १७ शाळांमधील ५११ विद्यार्थ्यांसह रायगड जिल्ह्यातील दुर्गम उंबरविरा येथील विद्यार्थांना सुमारे साडेसहा लाख रुपयांचे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. डॉ. सीमा शिंदे, कुसगावच्या सरपंच अश्विनी गुंड, उपसरपंच सूरज केदारी, आपटी गावच्या सरपंच अनिता शिळवणे, ग्रा.पं. सदस्य राजेश काटकर, फरीन शेख, गणेश गुंजाळ, उद्योजक गिरीश पारेख, सामाजिक कार्यकर्ते योगेश लोहार, ज्ञानेश्वर गुंड, केंद्र प्रमुख मुकुंद तनपुरे, मुख्याध्यापिका आशा मानकर आदी उपस्थित होते. कुसगाव बु. जिल्हा परिषद शाळेत गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा समारोप झाला. या वेळी मुलांना मातीला आकार देण्याचे काम कसे चालते, याची माहिती व्हावी याकरिता एक स्वयंचलित कुंभार चाक (पॉटरी मशिन) भेट देण्यात आले. महादेव शेलार यांनी सूत्रसंचालन केले. सहादू मानकर यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Lon22b01459 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..