लोणावळ्यात पदयात्रेद्वारे हुतात्म्यांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणावळ्यात पदयात्रेद्वारे
हुतात्म्यांना अभिवादन
लोणावळ्यात पदयात्रेद्वारे हुतात्म्यांना अभिवादन

लोणावळ्यात पदयात्रेद्वारे हुतात्म्यांना अभिवादन

sakal_logo
By

लोणावळा, ता. १० : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त व ऑगस्ट क्रांतिदिनी स्वातंत्र्य लढ्यातील हुताम्यांना अभिवादन करत ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वेमेंस फेडरेशन, हमाल पंचायत मावळ, धरणग्रस्त कृती समिती मावळ, जनरल कामगार सभा मावळ, क्रांतिकारी जन संघटना मावळ आदी संघटनांच्या वतीने संयुक्तरित्या लोणावळा शहरात अभिवादन पदयात्रा काढण्यात आली. ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वेमेंस फेडरेशनचे अध्यक्ष सुभाष गायकवाड, संजय गुरव, विलास कांबळे, बी. बी. गोसावी, सुलतान शेख, जयसिंग कांबळे, सुनील गोसावी, हमाल पंचायतचे प्रकाश कदम, नवनाथ आडकर, विलास ढम, मुकुंद काऊर आदी यावेळी सहभागी झाले होते. भांगरवाडी येथून ते बाजारपेठ सिद्धार्थनगर, गावठाण, शेतकरी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी पदयात्रा काढण्यात आली. पावसाची पर्वा न करता मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर होते. येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात हमाल पंचायतीचे राजाराम साबळे यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन सभा घेण्यात आली. लोणावळा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास बडेकर, माजी नगरसेवक साहेबराव टकले, ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वेमेंस फेडरेशनचे उपाध्यक्ष कोंडिबा रोकडे यांनीही उपस्थिती लावत मार्गदर्शन केले. क्रांतिवीर हुतात्मांना श्रद्धांजली वाहन्यात आली व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुभाष गायकवाड यांनी केले. सच्चिदानंद बलराज यांनी आभार मानले.

छायाचित्र: LON22B01895

(भाऊ म्हाळसकर, लोणावळा)

Web Title: Todays Latest Marathi News Lon22b01469 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..