विद्यार्थ्यांनी पोलिसांना बांधल्या राख्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांनी पोलिसांना बांधल्या राख्या
विद्यार्थ्यांनी पोलिसांना बांधल्या राख्या

विद्यार्थ्यांनी पोलिसांना बांधल्या राख्या

sakal_logo
By

लोणावळा, ता. ११ : विद्या प्रसारणी सभेचे व्हीपीएस हायस्कूल व द. पू. मेहता ज्युनिअर कॉलेज यांनी आपली परंपरा कायम राखत याही वर्षी लोणावळा शहर पोलिस स्टेशन व पोलिस प्रशिक्षण केंद्र खंडाळा या ठिकाणी जाऊन पोलिसांना बांधल्या. हायस्कूलच्या स्काउट आणि गाइड विद्यार्थिनींनी आपल्या पोलिस बांधवासोबत रक्षाबंधन साजरा केला.
कार्यक्रमासाठी पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य शशिकांत बोराटे, निरीक्षक संजय पराड, राखीव पोलिस निरीक्षक उमेश परदेशी, सहायक पोलिस निरीक्षक विलास पवार, प्रशालेचे प्राचार्य रामदास दरेकर, उपप्राचार्य आदिनाथ दहिफळे, उपमुख्याध्यापक दादाभाऊ कासार, पर्यवेक्षक विजय रसाळ, उदय महिंद्रकर, पर्यवेक्षिका सुनीता ढिले, वरिष्ठ लिपिक कुंडलिक आंबेकर उपस्थित होते. स्काऊट शिक्षक संजय पालवे वैशाली तारू, गंगाधर गिरमकर यांनी या उपक्रमाचे संयोजन केले.

केंद्रीय राखीव दलातील जवानांना राख्या
सोमाटणे, कामशेतच्या मुलींच्या वतीने तळेगाव येथील केंद्रीय राखीव पोलिस दलातील जवानांना राख्या बांधून व वृक्षारोपन करून अनोखे रक्षाबंधन केले. आज सकाळी मावळात संततधार पाऊस पडत असतानाही पावसाची तमा न बाळगता कामशेत येथील अनाथ श्रमातील मुलींनी रक्षाबंधन सणानिमित्त आपल्या आश्रमापासून वीस किलोमीटरवरील तळेगाव येथील केंद्रीय राखीव पोलिस दलातील जवानांना राख्या बांधून बहिनभावाच्या नात्याचा संदेश देत रक्षाबंधन सण साजरा केला. यानिमित्त मुलींच्या वतीने येथील मैदानात वड, पिंपळ, कडुलिंब, औषधी वनस्पतीसह एकूण दोनशे झाडांची लावणी करण्यात आली. त्यांना निगडी रोटरी क्लबचे श्री हरभजनसिंग दुल्लड, गुरदीपसिंग, निर्मलकुमार, गणेश भालेराव, संजय भालेराव, छाया मेहरा, आकाश मेहरा, कमलजित कौर, रमेश श्रीवास्तव, अनंत जालन आदींनी मदत केली. सर्व मुलींना कपडे, भेटवस्तू, छत्री भेट देण्यात आली. रक्षाबंधनानिमित्त या अनाथ मुलींना भाऊ मिळाला. सोमाटणे येथील मुलींनी बसकाका हनुमंतराव मुऱ्हे यांच्या मदतीने तळेगाव केंद्रीय राखीव दलातील जवांनाना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले. रक्षाबंधाची सांगता देशभक्तिपर गीतांनी झाली.

तळेगाव ः रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त जवानांना राख्या बांधताना मुली.
Smt11Sf1,2.

Web Title: Todays Latest Marathi News Lon22b01471 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..