पाऊस, धुके आणि पर्यटकांची गर्दी वर्षाविहार ः सलग सुट्यामुळे लोणावळा, खंडाळ्यातील चित्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाऊस, धुके आणि पर्यटकांची गर्दी   
वर्षाविहार ः सलग सुट्यामुळे लोणावळा, खंडाळ्यातील चित्र
पाऊस, धुके आणि पर्यटकांची गर्दी वर्षाविहार ः सलग सुट्यामुळे लोणावळा, खंडाळ्यातील चित्र

पाऊस, धुके आणि पर्यटकांची गर्दी वर्षाविहार ः सलग सुट्यामुळे लोणावळा, खंडाळ्यातील चित्र

sakal_logo
By

लोणावळा, ता. १४ ः महाराष्ट्राची पर्यटननगरी असा लौकिक असलेल्या लोणावळा व खंडाळ्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. दाट धुके आणि पावसाच्या सरी अंगावर झेलत वर्षाविहारासाठी गेल्या तीन दिवसांपासून पर्यटकांची गर्दी आहे.
सलग सुट्यांमुळे तीन दिवसांत राज्यभरातील पर्यटकांनी लोणावळ्यास भेट दिली. लोणावळ्यात सध्या पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. येथील थंड व आल्हाददायी वातावरणासह वर्षाविहाराचा पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहे.
पर्यटन हा लोणावळा आणि खंडाळ्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. शनिवार, रविवार, स्वातंत्र्य दिनानिमित्त सलग लागून आलेल्या सुट्यांमुळे ही पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत. लोणावळ्यात असलेले लायन्स पॉइंट, राजमाची उद्यान, भुशी धरण पर्यटकांच्या सर्वाधिक आकर्षणाचे मुख्य केंद्र आहेत. हे पॉइंट पर्यटकांच्या गर्दीने दिवसभर गजबजून जात आहेत. कार्ला, भाजे लेणी, लोहगड, पवना परिसरालाही पर्यटक भेटी देत आहे.


व्यावसायिकांना अच्छे दिन

सुट्यांमुळे लोणावळा पर्यटकांनी हाउसफुल्ल झाले होते. अनेक पर्यटकांना राहण्यासाठी हॉटेल उपलब्ध होत नसल्याने पर्यटकांनी आपला मुक्काम खासगी बंगले आणि ग्रामीण भागाकडे वळविला. सर्व हंगामात पर्यटकांची लोणावळा, खंडाळ्यास पसंती मिळते. मात्र साधारणपणे १५ ऑगस्टनंतर बाजारपेठेत काहीशी मंदी येते. मात्र सध्या हॉटेल व्यावसायिक, व्यापारी व स्थानिक नागरिकांना अच्छे दिन आले आहेत. येथील प्रसिद्ध चिक्की, जेली खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडते आहे. गेल्या तीन दिवसांतच बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल होण्याची शक्यता असून व्यापाऱ्यांमध्ये चैतन्य पसरले आहे.
मात्र, वाहतुकीच्या समस्येमुळे वाहनांना कुठेही थांबण्यास पोलिसांच्यावतीने मनाई करण्यात येत असून, त्यामुळे काहीसा परिणाम होण्याची शक्यता आहे.


फोटो ः 01932

Web Title: Todays Latest Marathi News Lon22b01479 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..