कुरवंडेच्या धनगरवस्तीवर पोचली वीज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुरवंडेच्या धनगरवस्तीवर पोचली वीज
कुरवंडेच्या धनगरवस्तीवर पोचली वीज

कुरवंडेच्या धनगरवस्तीवर पोचली वीज

sakal_logo
By

लोणावळा, ता. १६ : मावळ तालुक्यात कुरवंडे गावातील धनगरवस्तीवर अखेर वीज पोचली आहे. एका खासगी व्यावसायिकाच्या वतीने दुर्गम ठिकाणी वास्तव्यास असलेल्या धनगर व आदिवासी बांधवांसाठी कुरवंडेनजीक जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे अनेक येथील धनगर वस्ती विजेच्या प्रतीक्षेत होती. निधीअभावी या ठिकाणी सोयीसुविधा पुरविणे ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेरचे होते.
अखेर देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतानाच धनगर वस्तीवर वीज आल्याने त्यांची प्रतीक्षा संपली. आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांमुळे वीज पोचली. त्यामुळे या धनगर वस्तीमधील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून बारा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून धनगर वस्तीवर विद्युत पुरवठा करण्यासाठी २८ विजेचे खांब, विद्युत वाहक तारा आणि ६३ केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, कुरवंडेचे सरपंच अनिता दिलीप कडू, उपसरपंच सुप्रिया हरीश पडवळ, सदस्या चंदाराणी राऊत, राजश्री कडू, कविता ससाणे, साधना यादव, रोहिणी केदारी, सचिन कडू, रोहित गायकवाड, सखाराम कडू, सुरेश कडू, विशाल कडू, ग्रामसेविका उज्वला डावरे आदी उपस्थित होते. कुरवंडे येथे महिला अस्मिता भवन उभारण्यासाठी १० लाख व पथ दिव्यांसाठी पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार शेळके यांनी यावेळी दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Lon22b01482 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..