नांगराई गोविंदा पथकाने फोडली लोणावळ्यात मानाची हंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांगराई गोविंदा पथकाने फोडली 
लोणावळ्यात मानाची हंडी
नांगराई गोविंदा पथकाने फोडली लोणावळ्यात मानाची हंडी

नांगराई गोविंदा पथकाने फोडली लोणावळ्यात मानाची हंडी

sakal_logo
By

लोणावळा, ता. २० : लोणावळा परिसरात गोकुळाष्टमी निमित्त भाविकांच्या उत्साहाला उधाण आले होते. मावळ वार्ता फाउंडेशन, पत्रकार संघ, स्पेसलिंक केबल, लोणावळा शहरातील सर्व राजकीय पक्ष संघटनांच्यावतीने आयोजित दहीहंडी महोत्सवात नांगरगाव येथील नांगराई गोविंदा पथकाने रात्री उशिरा मानाची हंडी फोडली. तर तुंगार्ली येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आयोजित हंडी वलवन गोविंदा पथकाने फोडली.
दुपारी मान्यवरांच्या हस्ते हंडीचे पूजन करून हंडी उभारण्यात आली. गाण्यांवर आणि ढोल, लेझीम तसेच डीजेच्या तालावर नाचत पुण्या-मुंबईतील गोविंदा पथकाने यावेळी हजेरी लावत हंडीस सलामी दिली. नांगराई गोविंदा पथकाला मानाचे पहिल्या क्रमांकाचे रोख बक्षिस व सन्मानचिन्ह तसेच इतर वैयक्तिक बक्षीसे देण्यात आली.
कोरोनामुळे गेली दोन वर्ष दहीहंडी महोत्सव साजरा करण्यात आला नव्हता. यंदा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असल्याने गोविंदा पथकांच्या उत्साहाला उधाण आले होते. ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय गवळी यांच्या स्मरणार्थ यावेळी विजेत्या संघाला स्मृतीचिन्ह देण्यात आले. आमदार सुनील शेळके युवा मंचच्यावतीने स्थानिक गोविंदा पथकांना प्रत्येकी पाच हजार रुपये बक्षिस देण्यात आले. लोणावळा शहर आणि परिसरातील तुंगार्ली, वलवन, भांगरवाडी, नांगरगाव, गवळीवाडा, कुसगाव येथील स्थानिक गोविंदा पथके संघामध्ये मोठी चढाओढ बघायला मिळाली.