व्यवसाय करताना प्रामाणिकपणा जोपासावा ः उज्वल निकम काऊझी या दूध डेअरी प्रकल्पाचे उदघाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यवसाय करताना प्रामाणिकपणा
जोपासावा ः उज्वल निकम
काऊझी या दूध डेअरी प्रकल्पाचे उदघाटन
व्यवसाय करताना प्रामाणिकपणा जोपासावा ः उज्वल निकम काऊझी या दूध डेअरी प्रकल्पाचे उदघाटन

व्यवसाय करताना प्रामाणिकपणा जोपासावा ः उज्वल निकम काऊझी या दूध डेअरी प्रकल्पाचे उदघाटन

sakal_logo
By

लोणावळा, ता. २२ ः व्यावसायामध्ये माणुसकी जपावी, नैतिकता आणि नीतिमत्ता पाळावी लागते तरच हमखास यश मिळते, व्यवसाय करताना प्रामाणिकपणा जोपासावा, असे आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ व विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी लोणावळ्यात केले.
मावळ तालुक्यातील सदापूर येथे ‘काऊझी’ या दूध डेअरी प्रकल्पाचे निकम यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या पत्नी ज्योती निकम, पूजा निकम, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, काऊझी डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक प्रतीक पाळेकर, शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस ॲड. विजय पाळेकर, सीमा पाळेकर, संघटक रमेश पाळेकर, उद्योजक सुनील पाळेकर, प्रथमेश पाळेकर, माजी नगरसेविका ब्रिंदा गणात्रा आदी उपस्थित होते. आपण ज्या व्यवसायामध्ये काम करतो, त्याठिकाणी प्रामाणिकपणा, निष्ठा व समर्पित भावना असावी म्हणजे यश मिळते, असे निकम म्हणाले.
शेतीपूरक व्यवसायावर आधारित व्यवसायास चालना देत, अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मावळातील स्थानिक पातळीवरील ही पहिलीच डेअरी असल्याचे विजय पाळेकर म्हणाले. प्रशांत पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले. प्रतीक पाळेकर यांनी आभार मानले.


छायाचित्र ः ०1946

Web Title: Todays Latest Marathi News Lon22b01487 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..