मंकी हिलजवळ रेल्वे मार्गावर दरड कोसळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंकी हिलजवळ 
रेल्वे मार्गावर दरड कोसळली
मंकी हिलजवळ रेल्वे मार्गावर दरड कोसळली

मंकी हिलजवळ रेल्वे मार्गावर दरड कोसळली

sakal_logo
By

लोणावळा, ता. २३ : लोणावळा-कर्जत दरम्यान बोरघाटात मंकी हिलजवळ रेल्वे मार्गावर मंगळवारी (ता. २३) पहाटे दरड कोसळल्याने मिडल व डाउन मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळित झाली होती. मात्र पहाटेच्या सुमारास गाड्यांची वर्दळ नसल्याने अप व डाऊन दोन्ही मार्ग सुरू असल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला नाही.

दरम्यान, रेल्वेच्या वतीने रेल्वे मार्गावर आलेली दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दरडीमुळे इंजिनाची चाके रुळावरून उतरली. इंजिन पुन्हा रुळावर आणण्यासाठी काम सुरू आहे. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घाट सेक्शनमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास लोणावळ्याहून कर्जतला जाणाऱ्या रेल्वे इंजिनसमोर मंकी हिलजवळ रेल्वे किलोमीटर क्र. ११८ येथे दरड कोसळली. सुदैवाने या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही. काही दिवसांपूर्वीच मंकीहील जवळच दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळित झाली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Lon22b01489 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..