दरडींच्या छायेत लोहगड, ग्रामस्थांमध्ये भीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दरडींच्या छायेत लोहगड, 
ग्रामस्थांमध्ये भीती
दरडींच्या छायेत लोहगड, ग्रामस्थांमध्ये भीती

दरडींच्या छायेत लोहगड, ग्रामस्थांमध्ये भीती

sakal_logo
By

लोणावळा, ता. २४ : मावळ तालुक्यातील लोहगड गाव दरडींच्या छायेत आहे. लोहगड किल्ल्याचा काही भाग दरडींसह कोसळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र छोटी दरड असल्याने सुदैवाने यात कसलीही जीवित व वित्तहानी झाली नाही.

लोहगड गाव हे लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले असून किल्ल्याला लागूनच गावातील वस्ती‌ आहे. या वस्तीची लोकसंख्या ५०० च्या आसपास आहे. लोणावळा, कार्ला परिसरात अद्यापही पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. मावळ तालुक्यातील लोहगड गाव हे दरड प्रवण क्षेत्रात येते. त्यामुळे लोहगडला धोका असल्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला आहे. पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. स्थानिकांनी सतर्क राहत सावधगिरी बाळगण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या लोहगडाच्या महादरवाजावरील तटबंदीचा काही भाग काही वर्षांपूर्वी ढासळला होता.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून शासनाने तातडीने मदत व उपाययोजना कराव्यात व लोहगड गावाचे पुनर्वसन व्हावे, अशी मागणी ग्रामस्थ कैलास शेळके यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Lon22b01491 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..