लोणावळ्यात भव्य देखाव्यांवर भर गणेश मंडळांकडून स्वच्छता, आरोग्य व पर्यावरणावर जनजागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणावळ्यात भव्य देखाव्यांवर भर 
गणेश मंडळांकडून स्वच्छता, आरोग्य व पर्यावरणावर जनजागृती
लोणावळ्यात भव्य देखाव्यांवर भर गणेश मंडळांकडून स्वच्छता, आरोग्य व पर्यावरणावर जनजागृती

लोणावळ्यात भव्य देखाव्यांवर भर गणेश मंडळांकडून स्वच्छता, आरोग्य व पर्यावरणावर जनजागृती

sakal_logo
By

लोणावळा, ता. ६ ः लोणावळा परिसरात यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने पौराणिक, धार्मिक देखाव्यासह भव्य देखावे साकारण्यात आले आहे. गेली दोन वर्षे गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे गणपती साधेपणाने साजरे झाले होते. यंदा मात्र गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे.
लोणावळा परिसरात यंदा भव्य देखावे साकारण्यात येत आहे. त्याचबरोबर स्वच्छता, आरोग्य व पर्यावरण जागृती आदी विषयांवर जनजागृती करण्यात येत आहे. मात्र लोणावळ्यात सध्या सुरु असलेल्या पावसामुळे कार्यकर्त्यांसह नागरिकाच्या उत्साहावर पाणी पडले आहे. मानाचा पहिला गणपती असलेल्या रायवूड गणेश मंडळाचे यंदाचे ९८ वे वर्ष असून, मंडळाची गणेश मूर्ती भाविकांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. गणेश निकम यंदाच्या उत्सव कमिटीचे अध्यक्ष आहे. मानाचा दुसरा गणपती असलेला गावठाण येथील तरुण मराठा मंडळाच्यावतीने आकर्षक सजावट साकारली असून, सुमीत गवळी अध्यक्ष आहे. मानाचा तिसरा गणपती असलेला रोहिदास वाडा येथील संत रोहिदास मित्र मंडळ यंदा साधेपणाने उत्सव साजरा करत असून, नीलेश कदम हे मंडळाचे अध्यक्ष आहे. मानाचा चौथा गणपती असलेला गवळीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने स्वप्नमहाल साकारला असून गणेश शिवाप्पा गवळी अध्यक्ष आहे. मानाचा पाचवा गणपती असलेला वळवण येथील शेतकरी भजनी मंडळाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त सजावट करण्यात आली आहे. भव्य देखाव्यासाठी तसेच मावळचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेले शिवाजी मित्र मंडळाने यंदा अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. प्रकाश चौहान मंडळाचे संस्थापक अध्यक्ष असून राजेंद्र टाटिया उत्सव समितीचे अध्यक्ष आहेत. नवाबाजार येथील श्री नेहरू तरुण मंडळाने नटराज मंदिर साकारले आहे. मुकेश पालरेचा हे अध्यक्ष आहे. नाकोडा कॉम्प्लेक्समधील श्री राणाप्रताप नेताजी मित्र मंडळाने यंदा ‘सीता हरण'' हा पौराणिक देखावा सादर केला आहे. समीर धेंडे हे अध्यक्ष आहे. तुंगार्ली येथील ओमकार तरुण मंडळाने यंदा सामाजिक उपक्रमांवर भर देत ‘चार धाम’ दर्शन देखावा सादर केला आहे. माजी नगरसेवक राजू बच्चे मानद अध्यक्ष व बापूलाल तारे यंदाचे अध्यक्ष आहे. गावठाण येथील अष्टविनायक मंडळाचे आकर्षक संगीत कारंजे आकर्षणाचे आहे. यश सोनवणे हे अध्यक्ष आहे. छत्रपती शिवाजी चौकातील महात्मा फुले फळ- भाजी मंडई गणेशोत्सव मंडळाच्यावतीने यंदा हनुमान भक्ती देखावा सादर केला आहे. तम्माशेठ बोराटी मानद अध्यक्ष असून राजू बोराटी यंदाचे अध्यक्ष आहे.
टेबल लँड येथील श्री नवयुग मित्र मंडळाने तिरुपती बालाजीची भव्य मूर्ती बनविली आहे. तौफिक आत्तार हे यंदाचे अध्यक्ष आहे. मावळा पुतळा येथील तानाजी युवक मित्र मंडळ ‘हिंदवी स्वराज्याची शपथ’ हा ऐतिहासिक देखावा सादर केला आहे. आशिष पांव हे अध्यक्ष आहेत. लोणावळ्यातील सर्वांत जुना भांगरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पोस्टमनचाळ येथील श्री जय महाराष्ट्र मित्र मंडळ व गजानन मित्र मंडळ संयुक्तपणे गणेशोत्सव साजरा करत असून, अजय पाटील अध्यक्ष आहेत. मंडळाची लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेली गणेशमूर्ती भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. गावठाण येथील महाराष्ट्र मातंग समाज मंडळाच्यावतीने ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ ही सजावट केली आहे. आनंद बोभाटे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. सह्याद्रीनगर, हुडको मित्र मंडळाच्यावतीने यंदा साधेपणाने उत्सव साजरा करण्यात आले असून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. प्रियदर्शिनी संकुल येथील तुफान मित्र मंडळ राज पिसे अध्यक्ष असून, सप्तश्रृंगी देवीची प्रतिकृती साकारली आहे. शिवाजी उदय मित्र, रेल्वे पोर्टर चाळ येथील श्री साई आझाद मित्र मंडळ, नांगरगाव जयहिंद मित्र मंडळ गणेश मित्र मंडळ, भांगरवाडी येथील श्री शिवाजी युवक मित्र मंडळ, इंद्रायणीनगर मित्र मंडळ, इराणी चाळ नटराज मित्र मंडळ, खंडाळा येथील नवजीवन मित्र मंडळ, दत्तवाडी, कुसगाव येथील नवनाथ मित्र मंडळाच्या यंदा गणेशोत्सव धडाक्यात साजरा करत आहे.


लोणावळा सार्वजनिक गणेशोत्सव छायाचित्र व ओळी

छायाचित्रः Lon06p01
बाजारपेठ येथील शिवाजी उदय मंडळाने आकर्षक सजावट केली आहे

छायाचित्रः Lon06p02
पोस्टमनचाळ येथील जय महाराष्ट्र गजानन मंडळाची लालबागच्या राजाची मूर्ती भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे

छायाचित्रः Lon06p03
नाकोडा कॉम्प्लेक्स येथील राणाप्रताप नेताजी मंडळाने ‘सीता हरण’ हा पौराणिक देखावा सादर केला आहे


छायाचित्रः Lon06p04
अखिल फळ-भाजी मंडई गणेशोत्सव मंडळाने हनुमान भक्ती हा भव्य हलता देखावा सादर केला आहे

छायाचित्रः Lon06p05
नवा बाजार येथील नेहरू तरुण मंडळाने भव्य ‘नटराज महल’ साकारले आहे

छायाचित्रः Lon06p06
टेबललँड येथील श्री नवयुग महाराष्ट्र मंडळाने केलेली तिरुपती बालाजीची आकर्षक मूर्ती

छायाचित्र: Lon06p07
शिवाजी मित्र मंडळाच्यावतीने श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे


Lon06p08
महाराष्ट्र मातंग समाज मंडळाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देखावा सादर केला आहे

छायाचित्रः Lon06p09
मानाचा तिसरा गणपती असलेल्या संत रोहिदास मंडळाची गणेश मूर्ती

छायाचित्रः Lon06p10
तुफान मंडळाने साकारलेली सप्तश्रृंगी देवीची मूर्ती

छायाचित्रः Lon06p11
प्रियदर्शिनी संकुलातील अष्टविनायक मंडळाचे संगीतमय कारंजे आकर्षणाचे केंद्र आहे

छायाचित्र: Lon06p12
मानाचा दुसरा गणपती असलेल्या तरुण मराठा मंडळाची आकर्षक सजावट व मूर्ती


छायाचित्र: Lon06p13
रायवूड येथील मानाचा पहिला गणपती असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती व फुलांची सजावट

छायाचित्र: Lon06p14
मावळा पुतळा येथील तानाजी युवक मंडळाने हिंदवी स्वराज्याची शपथ हा ऐतिहासिक देखावा सादर केला आहे

छायाचित्र: Lon06p15
गवळीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने स्वप्नमहल साकारले आहे

छायाचित्र: Lon06p16
तुंगार्ली येथील ओंकार मंडळाने ‘चारधाम’ दर्शन घडविणारा धार्मिक देखावा सादर केला आहे

Web Title: Todays Latest Marathi News Lon22b01513 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..