तुंगार्लीतील शिबिरात १३२ जणांचे रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुंगार्लीतील शिबिरात
१३२ जणांचे रक्तदान
तुंगार्लीतील शिबिरात १३२ जणांचे रक्तदान

तुंगार्लीतील शिबिरात १३२ जणांचे रक्तदान

sakal_logo
By

लोणावळा, ता. ७ ः तुंगार्ली येथील ओमकार तरुण मंडळाच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात १३२ जणांनी रक्तदान केले. श्री शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे माजी नगरसेवक राजू बच्चे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक भूषण सुर्वे, संजीवनी ब्लड बँकेचे संचालक निशांत ढोले, डॉ. सुहास ढोले, ओमकार मंडळाचे अध्यक्ष बापूलाल तारे, हिंदुत्व ढोलताशा पथकाचे अध्यक्ष राकेश अंभोरे आदींसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. रक्तदात्यांना यावेळी ब्लुटूथ हेडफोन व हेल्मेट भेट देण्यात आले. ओमकार तरुण मंडळाच्यावतीने वर्षातून किमान दोन वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. रक्तदान करणाऱ्या सदस्यासाठी किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यासाठी वर्षभरात केव्हाही एकदा गरज भासल्यास रक्ताची बॅग मोफत दिली जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Lon22b01514 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..