निरोपासाठी लोणावळेकर सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निरोपासाठी लोणावळेकर सज्ज
निरोपासाठी लोणावळेकर सज्ज

निरोपासाठी लोणावळेकर सज्ज

sakal_logo
By

लोणावळा, ता. ८ : गेले दहा दिवस मनोभावे पूजा केलेल्या गणरायाला निरोप देण्यासाठी लोणावळेकर सज्ज झाले आहे. अनंत चर्तुदशीला विसर्जनासाठी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने विशेष तयारी करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी दिली. यंदा भांगरवाडी येथील मारुती मंदिरालगत इंद्रायणी नदीपात्रात गणेश मूर्तींचे विसर्जन टाळण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने पावले उचलण्यात आली आहे. लोणावळा तलाव या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिवदूर्ग मित्रची रेस्क्यू टीमही या ठिकाणी विशेषकरून तैनात असणार आहे. विसर्जनप्रसंगी नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता, बांधकाम, आरोग्य खात्यासह विद्युत विभागातील जवळपास पन्नास कर्मचारी नेमण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या वतीने गणेश मंडळाचे स्वागत करण्यात येणार असून, विशेष स्वागतकक्ष उभारण्यात येणार आहे. भांगरवाडीसह लोणावळा तलाव, वळवण तलाव आदी ठिकाणी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणेश मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. याठिकाणीही विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन ठिकाणी निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वयंसेवक, निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहे. विसर्जन मिरवणूक शांततामय मार्गाने पार पाडण्यासाठी तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी लोणावळा शहर पोलिसांच्या वतीने गणेश मंडळांची बैठक घेत सूचना केल्या. मिरवणुकीदरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रदूषण टाळत स्वच्छता राखण्यासाठी गणेश मूर्तीचे प्रतिकात्मक विसर्जन करण्यासाठी हुडको येथे महिला मंडळ इमारतीशेजारी नगरपरिषदेच्या वतीने कृत्रिम हौद बनविण्यात आला आहे. नागरिकांनी याठिकाणी विसर्जन करावे, असे आवाहन मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी केले आहे.

छायाचित्र: LON22B01998

Web Title: Todays Latest Marathi News Lon22b01515 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..