रिपाइं जनसंपर्क कार्यालयाचे लोणावळ्यात उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिपाइं जनसंपर्क कार्यालयाचे
लोणावळ्यात उद्‍घाटन
रिपाइं जनसंपर्क कार्यालयाचे लोणावळ्यात उद्‍घाटन

रिपाइं जनसंपर्क कार्यालयाचे लोणावळ्यात उद्‍घाटन

sakal_logo
By

लोणावळा, ता. १२ : लोणावळा शहर रिपब्लिकन पक्षाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, अशोक सरवते, संजय अडसुळे, राजू दळवी,अरविंद कुलकर्णी, रवी जाधव, विजय जाधव, विष्णू उजगरे, धनंजय भालेराव, संदीप भालेराव, विजय देसाई, राजू शिंदे, दत्तू गायकवाड, नारायण पाळेकर, अशोक बोभाटे, चंद्रकांत कांबळे, राजू देसाई, महिंद्रा देसाई, शेवंताबाई शिंदे, शोभा उजगरे, आशा जाधव, राधा उजगरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी रिपाइंचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. लोणावळा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पुढील काही महिन्यात होणार आहे. यापार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय घेण्यात आले आहे. या भागात पक्ष बळकटीचे काम करणाऱ्यांना पक्षातर्फे ताकद देण्याचे काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शुभेच्छा दिल्या. संघटना मजबूत करीत नगरपालिकेत रिपाइंच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्याची ग्वाही शहराध्यक्ष कमलशील म्हस्के यांनी दिली.


छायाचित्र: LON22B02017/2018
.

Web Title: Todays Latest Marathi News Lon22b01522 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..