झारा हुजेफा, सागर चौधरी प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झारा हुजेफा, सागर चौधरी प्रथम
झारा हुजेफा, सागर चौधरी प्रथम

झारा हुजेफा, सागर चौधरी प्रथम

sakal_logo
By

लोणावळा, ता. १ : विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्ट संचलित ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल लोणावळा आयोजित स्व. ॲड. शंकरराव दामोदर भोंडे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात झारा हुजेफा तर लहान गटात सागर चौधरी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तालुक्यातील १५ शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या. ही स्पर्धा ५ वी ते ७ वी व ८ वी ते ९ वी अशा दोन गटांत घेण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष ॲड. माधवराव भोंडे, सचिव राधिका भोंडे, दिलीप भोंडे, मुख्याध्यापक अमोल साळवे, अंजूम शेख, उपमुख्याध्यापिका तृप्ती गव्हले, उपमुख्याध्यापिका स्मिता इंगळे, पर्यवेक्षिका माधवी थत्ते उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व विद्यार्थ्याच्या अंगी असलेली कौशल्य विकसित व्हावीत हाच या स्पर्धेचा उद्देश असल्याचे संस्थेच्या सचिव राधिका भोंडे म्हणाल्या. अरविंद कुलकर्णी यांनी स्व. शंकरराव भोंडेंच्या आठवणींना उजाळा देत त्याच्या कार्याचा गौरव केला. संजय विद्वांस, अरविंद कुलकर्णी, सुनील यादव, बी. जी. माने, संजीव वीर, आनंद नाईक यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्रासह चषक देण्यात आले. भाग्यश्री पाटील यांनी सूत्रसंचालन तर रीना वानखेडे यांनी आभार मानले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे ः गट १- इ.५ वी ते ७ वी ः प्रथम क्रमांक- सागर राधारमण चौधरी (गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, लोणावळा), द्वितीय क्रमांक - शर्वरी संजीव पायघन (सरस्वती विद्यामंदीर, तळेगाव दाभाडे), तृतीय क्रमांक - आदित्य अमित दळवी ( ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल, लोणावळा), उत्तेजनार्थ शौर्य दामोदर गदादे व इशान दीपक तारे.
गट २ ः (इ. ८ वी ते १० वी) ः प्रथम क्रमांक-झारा हुजेफा (ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल, लोणावळा), द्वितीय क्रमांक- स्मृती मारुती आंबेकर (परिज्ञानाश्रम विद्यालय, कार्ला), तृतीय क्रमांक - हर्षदा रोहिदास गरुड (गुरुकुल हायस्कूल, लोणावळा), उत्तेजनार्थ-आयुष धनेश त्रिपाठी (जैन इंग्लिश स्कूल, तळेगाव दाभाडे) व जान्हवी श्रावण महाजन (प्रगती विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे).

छायाचित्र: LON22B02052