लोणावळा महाविद्यालयाचे प्रा. रवींद्र कडू यांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणावळा महाविद्यालयाचे 
प्रा. रवींद्र कडू यांचा सन्मान
लोणावळा महाविद्यालयाचे प्रा. रवींद्र कडू यांचा सन्मान

लोणावळा महाविद्यालयाचे प्रा. रवींद्र कडू यांचा सन्मान

sakal_logo
By

लोणावळा, ता. १२ : लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या लोणावळा महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. रवींद्र कडू यांच्या कार्याचा सेवानिवृत्ती निमित्ताने लोणावळ्यात सन्मान झाला.
प्रा. कडू यांनी ज्या महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतले त्याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवेत रुजू होणारे ते महाविद्यालयाचे पहिले विद्यार्थी होते. शिक्षण क्षेत्रातील प्रा. कडू यांच्या चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ वाटचालीनंतर यांच्या कार्याचा गौरव झाला. कडू यांचे स्नेही, लोणावळ्यातील विविध क्षेत्रासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी हजेरी लावली. राज्य प्राध्यापक महासंघाचे अध्यक्ष डॉ. एस. पी. लवांडे, लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे माजी सचिव दीपक गंगोळी, प्रा. कडू यांचे ज्येष्ठ बंधू सुरेश गोपाळ कडू, नारायण आंबेकर, रेवती कांबळे, बापुलाल तारे, जगदीश भोई, प्रा. रविकांत सागवेकर, अनिल खालापूरकर, डॉ. जे. ओ. बच्छाव, डॉ. विलास थोरात, डॉ. रंगनाथ सुपेकर, डॉ. महोदय रोकडे, डॉ. विजयकुमार खंदारे, डॉ. अशोक गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त करीत बहुआयामी व्यक्तिमत्त्व असा लौकिक असलेल्या प्रा. रवींद्र कडू यांच्या प्रदीर्घ सेवेचा गौरव केला. संगीतकार, गीतकार आणि दिग्दर्शकांची आत्मचरित्रे ''नाट्य सिनेकलावंतांची आत्मचरित्रे'', शोधनिबंध, कविता आणि लेख विविध राज्यसरीय व आंतरराष्ट्रीय सेमिनार तसेच नियतकालिके, मासिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. कडू यांच्या ‘चंदेरी दुनियेतील आत्मचरित्रे’ या पुस्तकाचे प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबूडकर यांच्या हस्ते
प्रकाशन झाले आहे. ‘आत्मसंवाद’ हे डॉ. कडू यांनी संपादित केलेले पाठ्यपुस्तक पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात जवळपास १० वर्षे होते. डॉ. संजय लांडगे यांनी प्रास्ताविक व परिचय केला. प्रा.संजय साळुंके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.संदीप लबडे यांनी आभार मानले.

छायाचित्र: LON22B02090