महिला सफाई कर्मचाऱ्यावर वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला सफाई कर्मचाऱ्यावर वार
महिला सफाई कर्मचाऱ्यावर वार

महिला सफाई कर्मचाऱ्यावर वार

sakal_logo
By

लोणावळा, ता.१२: लोणावळा रेल्वे स्थानक परिसरात कचरा टाकल्याने हटकल्याच्या रागातून महिला सफाई कर्मचाऱ्यावर हल्ला एकाने कोयत्याने वार केले. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. अलका राजू साबळे (वय ३८, रा. करंजगाव, ता मावळ, जि. पुणे) असे जखमी झालेल्या सफाई कर्मचारी महिलेचे नाव आहे. बुधवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी सचिन एकनाथ पवार (वय ३१, धंदा मजुरी, रा. आपटी, ता भोर, जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीमती साबळे यांनी आरोपी सचिन पवार यास रेल्वे पार्किंगमध्ये कचरा टाकल्यावरून हटकले होते. हा राग मनात ठेवून पवार याने फिर्यादी साबळे या मार्केट बाजूचे तिकीटघराशेजारील रेल्वे पूलावर साफसफाई करत असताना हटकल्याच्या रागातून लोखंडी कोयत्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये साबळे गंभीर जखमी झाल्या. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पोवार हे करीत आहे.