लोणावळेकरांना संगीतमय दिवाळीची पर्वणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणावळेकरांना संगीतमय दिवाळीची पर्वणी
लोणावळेकरांना संगीतमय दिवाळीची पर्वणी

लोणावळेकरांना संगीतमय दिवाळीची पर्वणी

sakal_logo
By

लोणावळा, ता. २३ : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात दिवाळी पहाट या संगीतमय कार्यक्रमांमुळे संगीतमय सुरांची पर्वणी मिळणार आहे. येथील सद्‍गुरू संगीत सदन व स्थानिक कलाकार प्रसिद्ध तबलावादक मनोज कदम यांच्यावतीने दिवाळी पाडव्याचे औचित्य साधत ‘रिधून दिवाळी पहाट’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सदनचे संचालक कदम यांनी दिली. येथील अॅड. बापूसाहेब भोंडे विद्यालयात बुधवारी (ता. २६) रोजी सकाळी सहा वाजता संगीतमय सकाळ रंगणार आहे. या कार्यक्रमात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. राजेंद्र कंदलगावकर यांच्या सुश्राव्य स्वरांची मेजवानी लोणावळेकरांना मिळणार आहे. याचबरोबर येथील ज्येष्ठ नागरिक संघ आणि मेहता म्युझिकल्सच्या राजेश मेहता, सुनील बोके यांच्या सौजन्याने अॅड. पुरंदरे विद्यालयासमोरील विरंगुळा केंद्रात स्थानिक कलाकारांच्या उपस्थितीत नव्या-जुन्या मराठी, हिंदी गाण्यांवर आधारित ‘दिवाळी संध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.