''स्वामी कुवल्यानंद योग'' पुरस्काराचे वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''स्वामी कुवल्यानंद योग'' पुरस्काराचे वितरण
''स्वामी कुवल्यानंद योग'' पुरस्काराचे वितरण

''स्वामी कुवल्यानंद योग'' पुरस्काराचे वितरण

sakal_logo
By

लोणावळा, ता.२३ ः ‘‘योग विद्या ही भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे’’, असे मत अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त व खजिनदार स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी व्यक्त केले.
जागतिक कीर्तीच्या कैवल्यधाम योग संस्थेच्या ९८ व्या स्थापना दिवसानिमित्त, शिक्षण तज्ज्ञ, लेखक डॉ.रमेश बिजलानी आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त खासदार डॉ.सत्यपाल सिंह यांना स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार प्रदान करण्यात आला. महामंडलेश्वर स्वामी श्री विश्वेश्वरानंद गिरी महाराज, कैवल्यधाम संस्थेचे अध्यक्ष ओ.पी. तिवारी, सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी आदी उपस्थित होते.
स्वामी गोविंद गिरी महाराज म्हणाले,‘‘योग ही प्राचीन भारतीय परंपरेची अमूल्य देणगी आहे. विचार आणि कृती, मनुष्य आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद तसेच आरोग्य, कल्याणासाठी एक समग्र दृष्टिकोन योगाच्या माध्यमातून प्राप्त होतो.’’
स्वामी विश्वेश्वरानंद गिरी महाराज यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. यावेळी ‘कुवल्यानंदांची गाणी’, ‘योगिक संघ व्यायाम’ आणि ‘द बुक ऑफ ओम’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविकात सुबोध तिवारी यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. रजनी प्रधान, अनिल त्रिवेदी यांनी सूत्रसंचालन केले.