बोरघाटातील अपघातात दोन ठार रिक्षा आणि बसची धडक, मृतांमध्ये रेल्वेचे चालक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरघाटातील अपघातात दोन ठार
रिक्षा आणि बसची धडक, मृतांमध्ये रेल्वेचे चालक
बोरघाटातील अपघातात दोन ठार रिक्षा आणि बसची धडक, मृतांमध्ये रेल्वेचे चालक

बोरघाटातील अपघातात दोन ठार रिक्षा आणि बसची धडक, मृतांमध्ये रेल्वेचे चालक

sakal_logo
By

लोणावळा, ता. ६ ः बोरघाटात खोपोलीतील सायमाळ येथे रिक्षा आणि बसच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर रिक्षाचालकासह अन्य दोघे जण जखमी झाले. रविवारी (ता. ६) सकाळी हा अपघात झाला.
कुमार गौरव गौतम (वय-२६, रा. रीवा, मध्यप्रदेश) आणि शत्रुंजय त्रिपाठी (वय-२७, रा. मध्यप्रदेश) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. जखमींमध्ये राघवेंद्र राठोड, सौरभ पाठक व रिक्षाचालक किरण वाघमारे यांचा समावेश आहे. दोन्ही मृत पश्चिम रेल्वेमध्ये चालक पदावर कार्यरत होते.
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्युमुखी पडलेले कुमार गौरव गौतम, शत्रुंजय त्रिपाठी तसेच जखमी राघवेंद्र राठोड आणि सौरभ पाठक हे चौघेही पश्चिम रेल्वेत लोको पायलट म्हणून कार्यरत आहेत.
आज सकाळी लोणावळ्याजवळील वेट अँड जॉय वॉटर पार्कमध्ये सुटीसाठी आले होते. त्यानंतर ते लोणावळ्याहून खोपोली येथे रिक्षामधून (एमएच १४ एचएम ५२९६) जात होते. त्यावेळी बोरघाटात सायमाळ येथे तीव्र उतार व वळणावर रिक्षाची पुण्याकडे निघालेल्या प्रवासी बसला (एमएच ०४ ९९२५) धडक बसली. यामध्ये कुमार गौरव गौतम याचा जागीच मृत्यू झाला तर शत्रुंजय त्रिपाठी याचा उपचारासाठी नेत असताना वाटेत मृत्यू झाला. राघवेंद्र राठोड, सौरभ पाठक व रिक्षाचालक किरण वाघमारे हे किरकोळ जखमी झाले.
घटनेची माहिती कळताच सहायक पोलिस निरीक्षक हरीश काळसेकर, पोलिस कर्मचारी आणि सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू केले. जखमींवर खोपोली नगरपरिषद रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-------------------------------

फोटो ः 02137, 02138, 02139