कोयना एक्स्प्रेसच्या धडकेत अज्ञात तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोयना एक्स्प्रेसच्या धडकेत 
अज्ञात तरुणाचा मृत्यू
कोयना एक्स्प्रेसच्या धडकेत अज्ञात तरुणाचा मृत्यू

कोयना एक्स्प्रेसच्या धडकेत अज्ञात तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By

लोणावळा, ता. ः पळसदरी-जांबरुंग दरम्यान बोरघाटात मुंबई ते कोल्हापूर कोयना एक्स्प्रेसच्या धडकेत अज्ञात तरुणाचा मृत्यू झाला. सोमवारी (ता. ७) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृताचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे आहे. रंगाने काळासावळा, अंगाने सडपातळ, कपाळ मध्यम, नाक सरळ, कान बारीक, दाढी खुरटी व डोक्याचे केस काळे असे मृताचे वर्णन असून मृताच्या डाव्या हाताचा अंगठा नसून उजव्या हातावर सफेद कोड आहे. मृताच्या अंगात फिकट गुलाबी रंगाचा शर्ट व राखाडी रंगाची पॅंट असा पेहराव आहे. मृताची ओळख अद्याप पटलेली नसून मृताविषयी माहिती असल्यास लोणावळा रेल्वे दूरक्षेत्र पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस हवालदार ए. डी. जाधव करत आहे.