वेहेरगावात दीपोत्सवाला ग्रामस्थची मोठी गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेहेरगावात दीपोत्सवाला 
ग्रामस्थची मोठी गर्दी
वेहेरगावात दीपोत्सवाला ग्रामस्थची मोठी गर्दी

वेहेरगावात दीपोत्सवाला ग्रामस्थची मोठी गर्दी

sakal_logo
By

लोणावळा, ता. ९ ः आई एकविरा देवी गडाच्या पायथ्याशी वसलेल्या वेहरगाव गाव येथील शिवमंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शिवशंकर मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती लाभली. हजारो दिव्यांनी दीपोत्सव साजरा करण्यात येत मंदिर उजळून गेले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे उपजिल्हा प्रमुख सुरेश गायकवाड, एकनाथ गायकवाड, हनुमंत देवकर, बबन पडवळ, शुभम गायकवाड, बाळासाहेब फाकटकर, तुकाराम गायकवाड, चिंधू बोरकर, नवनाथ गायकवाड, दशरथ लांडगे, पांडुरंग बोत्रे, रमेश पडवळ, सुरज पडवळ, तेजस खिरे, साहिल येवले, सुनील गायकवाड, किशोर बोत्रे, बाळू गायकवाड, स्वप्नील गायकवाड यांच्यासह लहान मुले, महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.


छायाचित्रः LON22B02149