भाजे ते लोहगड ‘संपर्क हेरिटेज वॉक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजे ते लोहगड 
‘संपर्क हेरिटेज वॉक’
भाजे ते लोहगड ‘संपर्क हेरिटेज वॉक’

भाजे ते लोहगड ‘संपर्क हेरिटेज वॉक’

sakal_logo
By

लोणावळा, ता. १३ : मावळातील लोणावळा परिसरात असलेला प्राचीन गौरवशाली प्राचीन वारसा जगासमोर यावा, त्याचे जतन व्हावे तसेच ग्रामीण पर्यटन व्यवसायाला मिळावी या उद्देशाने येथील संपर्क संस्थेच्या वतीने भाजे ते लोहगड किल्ला दरम्यान ‘संपर्क हेरिटेज वॉक’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे संचालक अमितकुमार बॅनर्जी यांनी दिली.

कधी होणार
- रविवारी (ता. १८ डिसेंबर) सकाळी आठ वाजता रोजी भाजे येथून या नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीत हेरिटेज वॉकला सुरुवात होणार असून, लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी समारोप होणार
फोटो ः भाजे लेणी किंवा लोहगडचा वापरावा

कोण सहभागी होणार
- भाजे, लोहगड, घेरेवाडी परिसरातील ग्रामस्थांसह हजारो विद्यार्थी, इतिहासप्रेमी, कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी, नागरिकांचा हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होणार

किती अंतर
- भाजे ते लोहगड हे साधारणपणे साडेतीन किलोमीटरचे अंतर पायी चालणे
मॅप

खायला काय मिळणार
- मार्गावर सहभागी होणाऱ्यां‍साठी खास महाराष्ट्रीय खाद्य पदार्थ त्यामध्ये झुणका भाकर, चटणी भाकर, ठेचा, मक्याचे कणीस आदी पारंपरिक महाराष्ट्रीय खाद्य पदार्थांचा आस्वाद देखील इतिहास प्रेमींना घेता येणार
फोटो ः ४७००

कशासाठी आहे वॉक
- देशातील संस्कृतीचे दर्शन घडविणारे सोळा लोककला, पारंपरिक खेळ, क्रीडा प्रकार त्यामध्ये मल्लखांब, तलवारबाजी, लाठी-काठी आदी ऐतिहासिक मैदानी खेळांचे प्रात्यक्षिक, ढोल-लेझीम पथक, पारंपरिक वाद्य, वासुदेव, पोतराज, गोंधळ, लोकनाट्य, महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमांचे दर्शन, इतिहासाची झलक हेरिटेज वॉकदरम्यान सहभागींना घेता येणार
- पुरातत्त्व आणि वनखात्याच्या कायद्यांमुळे वारसास्थळांकडे दुर्लक्ष होत आहे. भौतिक सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारच्या सहभागाची गरज असून अशा हेरिटेज वॉकच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतात

संपर्क संस्था काय आहे
संपर्क संस्थेच्या बालग्रामच्या माध्यमातून जवळपास बाराशे अनाथ मुलांच्या संगोपनाचे कार्य करीत आहे. या उपक्रमातून जमा होणाऱ्या निधीतून अनाथ मुलांना नवी ओळख देत त्यांना आपल्या पायावर उभे करण्यात येत आहे. यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.
लोगो ः ५१५४

जागतिक वारसा म्हणून नोंद
कार्ला, मळवली, भाजे, पाटण परिसरातील लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची किल्ले प्राचीन कला-संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या कार्ला, भाजे, बेडसे लेण्यांचे वैभव मावळास लाभले आहे. यास्थळांची ओळख केवळ मावळापुरती राहून नये तर जागतिक स्तरावर व्हावी. हेरिटेज वॉकच्या माध्यमातून प्राचीन वास्तूंचे जतन व्हावे, या वैभवांचा युनेस्कोमध्ये जागतिक वारसा म्हणून सहभाग व्हावा यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती संपर्क संस्थेचे संचालक अमितकुमार बॅनर्जी यांनी दिली.
फोटो ः २१५६


हेरिटेज बॅगराउंड फोटो ः १५८७४२२५१८, १७९३६४४०६९, १३४८५१८७७६