औद्योगिक सहकारी वसाहतीच्या अध्यक्षपदी कोराड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औद्योगिक सहकारी वसाहतीच्या अध्यक्षपदी कोराड
औद्योगिक सहकारी वसाहतीच्या अध्यक्षपदी कोराड

औद्योगिक सहकारी वसाहतीच्या अध्यक्षपदी कोराड

sakal_logo
By

लोणावळा, ता. २० : नांगरगाव येथील लोणावळा औद्योगिक सहकारी वसाहतीच्या अध्यक्षपदी संदीप संभाजी कोराड यांची अध्यक्षपदी तर शीतल अनिल पतंगे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. संस्थेच्या संचालक पदासाठी पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. यानंतर अध्यक्षपदी कोराड तर उपाध्यक्षपदी पतंगे यांची वर्णी लागली. तर नवनिर्वाचित संचालक मंडळामध्ये माजी अध्यक्ष देवराम लोखंडे, नीलेश वर्तक, अनिकेत जांभेकर, आशिष शहा, मंगेश अगरवाल, विजय मंगतानी, मोनिका गावडे, वसंत शिर्के, रिटा जैन, नितीन सोनवणे, सुभाष सूर्यवंशी, प्रतिमा बलसारा आदींचा समावेश आहे.