लोणावळा शहर भाजपचे राहुल गांधीं विरोधात आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणावळा शहर भाजपचे 
राहुल गांधीं विरोधात आंदोलन
लोणावळा शहर भाजपचे राहुल गांधीं विरोधात आंदोलन

लोणावळा शहर भाजपचे राहुल गांधीं विरोधात आंदोलन

sakal_logo
By

लोणावळा, ता. २१ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात लोणावळा शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करीत आंदोलन करण्यात आले.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नव्हे तर भारत तोडो यात्रा असल्याची टीका करीत राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यावर दुधाने अभिषेक करण्यात आला. माजी नगरसेवक राजाभाऊ खळदकर यांनी राहुल गांधी यांना या भारत जोडो यात्रेचा कंटाळा आला असून ही यात्रा थांबावी म्हणून अशी वेडीवाकडी वक्तव्य केली जात असल्याचे सांगितले. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी हे लोकांमध्ये तिरस्कार आणि द्वेषाची भावना पसरवीत असल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल म्हणाले. महाराष्ट्र भूमीत येऊन येथील देशभक्तांची अवहेलना आणि अपमान करू नका, असे आवाहन युवामोर्चा अध्यक्ष शुभम मानकामे यांनी यावेळी केले.

येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे झालेल्या आंदोलनात भाजपचे माजी नगरसेवक विजय सिनकर, अरुण लाड, अर्जुन पाठारे, अभय पारख, प्रदीप थत्ते, कमलेश सेंगर, सचिन ढोकरिया, सुषमा कडू, चारुलता कमलवार, अदिती होगले, श्रवण चिकणे, प्रथमेश पाळेकर, शैलेश ठाकर, वैभव वायकर, चैतन्य दळवी, जयप्रकाश परदेशी यांच्यासह भाजप युवा मोर्चा पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.