लोणावळ्यात अपघातात टेम्पोचालकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणावळ्यात अपघातात टेम्पोचालकाचा मृत्यू
लोणावळ्यात अपघातात टेम्पोचालकाचा मृत्यू

लोणावळ्यात अपघातात टेम्पोचालकाचा मृत्यू

sakal_logo
By

लोणावळा, ता. २४ : पुणे-मुंबई महामार्गावर वलवण गावच्या हद्दीत टेम्पोने अज्ञात वाहनाला ठोकरल्याने झालेल्या अपघातात टेम्पो चालकाचा मृत्यू झाला. बुधवारी (ता. २३) सकाळी हा अपघात झाला. सिद्धप्पा गुरूपाद कल्लूर (वय - ४०, रा. साईनगर, मामुर्डी, पुणे) असे मृत्यू झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. हैयलप्पा गुरुपाद कल्लूर यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. याप्रकरणी लोणावळा पोलिसांनी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.