कै. शंकरराव नाना हुलावळे सभागृहाचे कार्ल्यात उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कै. शंकरराव नाना हुलावळे 
सभागृहाचे कार्ल्यात उद्‍घाटन
कै. शंकरराव नाना हुलावळे सभागृहाचे कार्ल्यात उद्‍घाटन

कै. शंकरराव नाना हुलावळे सभागृहाचे कार्ल्यात उद्‍घाटन

sakal_logo
By

लोणावळा, ता. २५ : कार्ला ग्रामपंचायतीच्या बहुउद्देशीय इमारतीमधील सभागृहास माजी जिल्हापरिषद सदस्य व कार्ल्याचे माजी सरपंच कै. शंकरराव नाना हुलावळे यांचे नाव देण्यात आले आहे.
कार्ल्यातील विकासामध्ये शंकरराव हुलावळे यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण पुढील पिढीला व्हावे, यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने पुढाकार घेण्यात येत त्यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी व मावळ पंचायत समितीच्या माजी सभापती जनाबाई हुलावळे यांच्या हस्ते नूतनीकरण करण्यात आलेल्या सभागृहाचे उद्‍घा‍टन झाले.
या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भरत मोरे, माजी पंचायत समिती सदस्य दीपक हुलावळे, सरपंच दीपाली हुलावळे, उपसरपंच किरण हुलावळे, सदस्य सागर जाधव, भारती मोरे, उज्वला गायकवाड, सुभाष धोत्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव अमोल केदारी, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश कडू, माजी सरपंच निशा हुलावळे, कार्ला सोसायटीचे चेअरमन प्रशांत हुलावळे, रघुनाथ मराठे, सुभाष हुलावळे, तुकाराम हुलावळे, सदाशिव हुलावळे, दत्तात्रय हुलावळे, सारिका हुलावळे, रूपाली हुलावळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. गावच्या विकासाची तळमळ घेऊन काम करणाऱ्या शंकरराव हुलावळे यांनी बावीस वर्षे सरपंचपद भूषविले. त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देत ग्रामस्थांनी भावना व्यक्त केल्या. त्यांचे सर्व क्षेत्रात योगदान आहे, समाजप्रेम निर्माण करण्याचे काम त्यांनी केले, असे मत भरत मोरे यांनी व्यक्त केले.

: LON22B02196