
सह्याद्री सायक्लोट्रेकची लोणावळ्यात सायकल फेरी
लोणावळा, ता. २८ः सह्याद्री सायक्लोट्रेक व लोणावळा सायकलिंग क्लबच्या वतीने २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेले नागरिक आणि पोलिस जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आरोग्य, तंदुरुस्ती, इंधन वाचवा, निसर्ग वाचवा आणि शांततेचा संदेश देत पुणे-मुंबई सद्भावना सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. २६ नोव्हेंबर २००८ साली मुंबईवर दहशतवादी झाला, खरे तर हा हल्ला मुंबई वर नसून हा हल्ला देशावर, मानवतेवर, सहिष्णूतेवर झाला होता. या हल्ल्यामध्ये अनेक निष्पाप नागरिक, लष्करी जवान, पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण ठेवत, सर्व पवित्र आत्म्यांना श्रद्धांजली देणाच्या हेतूने सद्भावना सायकल फेरीचे सन २००९ पासून आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या वर्षी रॅलीमध्ये ४ जण या फेरीमध्ये सहभागी झाले होते. यंदा सदर रॅलीमध्ये ८ वर्षे ते ६० वर्षे वयाच्या शंभराहून अधिक सायकलस्वारांनी सहभाग घेतला अशी माहिती सायकलपटू भरत भरणे यांनी दिली. सायकल फेरीसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड पोलिस, ध्रुवा सॉफ्टवेअर, न्यूक्लिअस न्यूट्रीशन, एसकेपी कॉर्प, फॉक्सिल टुरिझम, रिव्हज, गोल्ड जिम, कामगार क्रांती संघटना, अन्नपूर्णा हॉटेल यांचे सहकार्य लाभले.
छायाचित्र LON22B02200
(भाऊ म्हाळसकर,लोणावळा)