Fri, Feb 3, 2023

लोणावळ्यात मूक मोर्चा
लोणावळ्यात मूक मोर्चा
Published on : 21 December 2022, 11:58 am
लोणावळा : लोणावळा, खंडाळ्यातील सकल जैन समाजाच्या वतीने ‘लोणावळा बंद’ची हाक देत दुकाने, व्यवहार बंद ठेवला. मावळा पुतळा ते लोणावळा नगरपरिषद अशी निषेध रॅली काढली. या मध्ये लोणावळा, खंडाळ्यातील जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी स्थानिक पोलिस अधिकारी व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.