वेश्याव्यवसाय प्रकरणी लोणावळ्यात हॉटेलवर छापा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेश्याव्यवसाय प्रकरणी 
लोणावळ्यात हॉटेलवर छापा
वेश्याव्यवसाय प्रकरणी लोणावळ्यात हॉटेलवर छापा

वेश्याव्यवसाय प्रकरणी लोणावळ्यात हॉटेलवर छापा

sakal_logo
By

लोणावळा, ता. ३१ : शहरातील मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलवर वेश्याव्यवसाय प्रकरणी लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी धडक कारवाई करत दोन महिलांची सुटका करण्यात आली. लॉजमध्ये वेश्या व्यवसायाकरिता महिला बोलावून त्यांना वेश्याव्यवसाय करणेस प्रवृत्त करून अनैतिक व्यापार केल्याप्रकरणी हॉटेल चालक सतीश एच. शेट्टी (वय ५९, रा. सुदर्शन हॉटेल, मुंबई-पुणे रोड, लोणावळा) याच्यासह एका २८ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. सत्यसाई कार्तिक हे अवैध व्यवसायाच्या विरोधात आक्रमक झाले असून, अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, लोणावळा शहरातील अपोलो गॅरेज जवळील सुदर्शन लॉज याठिकाणी बेकायदेशीर वेश्या व्यवसाय सुरू आहे. या माहितीच्या आधारे बनावट गिऱ्हाईक तयार करून सापळा रचत दोन महिलांची सुटका करत त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली.

खंडाळ्यात ६८ हजारांचा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त
लोणावळा शहर पोलिसांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला शिवाजी पेठ खंडाळा येथे अवैधरीत्या देशी व विदेशी मद्याचा साठा करत त्याची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई करत त्याच्याकडील तब्बल ६८ हजार २२० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. पोलिस हवालदार मयूर अबनावे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून अजय रामचंद्र जांभूळकर (वय ५६, रा. शिवाजी पेठ, खंडाळा) याच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.