चेन्नई एक्सप्रेसच्या धडकेत अज्ञात महिलेचा मृत्यू

चेन्नई एक्सप्रेसच्या धडकेत अज्ञात महिलेचा मृत्यू

लोणावळा, ता. ५ : लोणावळा ते खंडाळा दरम्यान चेन्नई एक्सप्रेसच्या धडकेत अज्ञात महिलेचा शनिवारी (ता. ४) सायंकाळी मृत्यू झाला. डाऊन लाइनवर रेल्वे कि.मी. क्र. १२५ जवळ ही घटना घडली. मृत महिलेचे वय अंदाजे ५० वर्ष असून उंची पाच फूट आहे. रंगाने निमगोरी, अंगाने सडपातळ, चेहरा उभट, डोक्याचे केस काळे पांढरे वाढलेले असे महिलेचे वर्णन असून अंगात केशरी रंगाची साडी व काळ्या रंगाचा ब्लाऊज त्यावर वर्तुळ असा पेहराव आहे. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून सदर महिलेविषयी माहिती असल्यास लोणावळा रेल्वे दूरक्षेत्राचे पोलिस हवालदार एस. इ. सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com