Thur, June 8, 2023

भरधाव वाहनाच्या धडकेत अज्ञाताचा मुत्यू
भरधाव वाहनाच्या धडकेत अज्ञाताचा मुत्यू
Published on : 16 February 2023, 8:30 am
लोणावळा, ता. १६ : मुंबई - पुणे महामार्गावर खंडाळा येथील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम जवळ भरधाव वाहनाच्या धडकेत अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बुधवारी (ता. १५) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृताचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे आहे. याबाबत लोणावळा शहर पोलिस शिपाई भूषण दशरथ कुँवर यांनी अज्ञात वाहनचालक विरोधात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्यू झालेला अज्ञात मुंबई - पुणे जुना महामार्ग येथील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम समोरील रस्ता ओलांडत असताना भरधाव वाहनाने त्यास धडक दिली. व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.