लोणावळ्यातील बंद पडलेली गॅसदाहिनी अखेर कार्यान्वित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणावळ्यातील बंद पडलेली
गॅसदाहिनी अखेर कार्यान्वित
लोणावळ्यातील बंद पडलेली गॅसदाहिनी अखेर कार्यान्वित

लोणावळ्यातील बंद पडलेली गॅसदाहिनी अखेर कार्यान्वित

sakal_logo
By

लोणावळा, ता. ८ : येथील कैलासनगर वैकुंठ स्मशानभूमीतील गॅस शवदाहीनी अखेर कार्यान्वित करण्यात आली आहे.
माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, भाजपचे शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नितीन आगरवाल, ललित सिसोदिया, रचना सिनकर, मंदा सोनवणे, वसंत भांगरे, देवराम लोखंडे, शुभम मानकामे, आशिष बुटाला, जितेंद्र कल्याणजी आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला.
लोणावळा नगरपरिषदेने सुमारे आठ कोटी रुपये खर्चून ‘जी'' वॉर्ड येथील कैलासनगर स्मशानभूमीचे नूतनीकरण करत गेल्या वर्षी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‍घाटन केले. यामध्ये गॅस शवदाहिनीचाही समावेश होता. नागरिकांच्या सोयीसाठी स्मशानभूमीत उभारलेली गॅस शवदाहीनी ती उभारल्यापासून तांत्रिक कारणांमुळे बंद होती. ही गॅस शवदाहिनी कार्यान्वित करण्यासाठी नगरपरिषदेने लवकरात लवकर ऑपरेटरची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली होती. गॅसदाहिनीसाठी वर्षभर मोफत गॅस पुरविण्याची तयारी माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी दाखवली होती. अखेर शवदाहिनी कार्यान्वित झाल्याने स्मशानभूमीतील गैरसोय कमी होणार आहे. पुजारी म्हणाले, ‘‘सामाजिक बांधिलकीच्या नात्याने स्वखर्चाने ही गॅस शवदाहिनीसाठी आवश्यक असणारे गॅस सिलिंडर पुढील एक वर्षासाठी पुरविणार असून, वृक्षतोड, प्रदूषण कमी होत पर्यावरण संवर्धन तसेच अंत्यविधीसाठी होणारा खर्च कमी होणार आहे. स्मशानभूमीत नागरिकांसाठी स्वच्छतागृहाची सोय केलेली नाही, स्मशानभूमी परिसरात स्वच्छता केली जात नसल्यामुळे त्या ठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. अवाढव्य खर्च करूनही स्मशानभूमी घाणीच्या तसेच असुविधांच्या गर्तेत असल्याने त्या दूर करावे, अशी मागणी करण्यात आली.

छायाचित्रे: LON23B02394/02395