शिवजयंतीनिमित्त
 लोणावळ्यात विविध उपक्रम

शिवजयंतीनिमित्त लोणावळ्यात विविध उपक्रम

लोणावळा, ता. १० : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत, विविध संस्था, मंडळांच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या शिवप्रतिमेच्या मिरवणुका, पोवाड्यांच्या आवाजात परिसर शिवमय झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. विविध गड-किल्ल्यावरून आणलेल्या शिवज्योतीचे लोणावळेकरांनी स्वागत केले. भांगरवाडी येथे शिवजन्मोत्सव मंडळाच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी चौक, तालमीचा ओटा येथे ग्रामस्थांच्या हस्ते श्री शिवप्रतिमा पूजन करण्यात आली. कुसगाव बुद्रूक येथील भैरवनाथ तरुण मंडळ, दत्तवाडी येथील नवनाथ मित्र मंडळ, तुंगार्लीतील जाखमाता मंडळ, नांगरगाव, वळवण, खंडाळा, रायवूड मित्र मंडळासह लोणावळा गावठाण, वरसोली, वाकसई, औंढे-औंढोली येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

शिवप्रेमींना अल्पोपाहार
लोहगड, विसापूर व राजमाची येथून शिवज्योती घेऊन येणाऱ्या मावळ्यांचे कार्ला ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत करण्यात आले. येथील श्री शिवशंकर मंडळ, संजय ऊर्फ अवानाना प्रतिष्ठान, युवासेना शाखेच्यावतीने शिवप्रतिमेचे पूजन केले. तसेच शिवभक्तांनी अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

शिलाटणे येथे अपघाताचे सावट
पुरंदर तालुक्यातील मल्हारगडावरून शिवज्योत घेऊन येताना शिलाटणे येथील शिवभक्तांना झालेल्या अपघातात तीस ते पस्तीस युवक जखमी झाले. यामुळे गावात दुःखाचे छाया पसरली.

फोटोः 02400, 02401

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com