लोणावळ्यात तारांबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणावळ्यात तारांबळ
लोणावळ्यात तारांबळ

लोणावळ्यात तारांबळ

sakal_logo
By

लोणावळा : परिसरास गुरुवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वारा आणि पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे लोणावळाकरांसह व्यावसायिकांची तारांबळ उडाली. लोणावळ्यासह खंडाळा, कुसगाव बु., कार्ला परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.