चौदा सिद्धचरण पादुकांचा लोणावळ्यात दर्शन सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चौदा सिद्धचरण पादुकांचा लोणावळ्यात दर्शन सोहळा
चौदा सिद्धचरण पादुकांचा लोणावळ्यात दर्शन सोहळा

चौदा सिद्धचरण पादुकांचा लोणावळ्यात दर्शन सोहळा

sakal_logo
By

लोणावळा, ता. २१ ः ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त लोणावळ्यात चौदा सिद्ध चरण पादुकांचा दर्शन सोहळा होणार आहे. यानिमित्त प्रसिद्ध गायक पंडित अजित कडकडे यांच्या गायन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गुढी पाडव्यास भांगरवाडी येथील सुमित्रा हॉल येथे श्री स्वामी समर्थ शंकर चिले सेवा परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थ शंकर चिले सेवा परिवाराचे अध्यक्ष मनोहर, राजू निकम यांनी ही माहिती दिली.
गुरुवारी (ता.२३) श्री स्वामी समर्थ महाराज, श्री शंकर बाबा महाराज, श्री चिले महाराज, श्री साईनाथ महाराज, श्री गजानन महाराज, श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, समर्थ रामदास स्वामी, श्री साई गगनगिरी महाराज, श्री चैतन्य कानिफनाथ महाराज, श्री बाळूमामा, श्री दत्तगुरु गिरनारी, श्री सद्‍गुरू शिवाजी महाराज विडणी, जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज या चौदा विभूतींच्या चरण पादुकांचा दर्शन सोहळा होणार आहे.
याचबरोबर श्री प्रशांत कळसकर यांनी जतन केलेल्या सद्‍गुरु शंकर महाराज धनकवडी व सद्‍गुरु शिवाजी महाराज, विडणी यांच्या मूळ वापरलेल्या चर्म पादुका व श्री अभ्यंकर पुणे यांच्याकडील सद्‍गुरू चिले महाराज यांनी वापरलेल्या टोपीचे दर्शनही भाविकांना घेता येणार आहे. रात्री साडेसात वाजता भाषा वैभव संदीपान महाराज शिंदे यांचे कीर्तन होणार आहे.