लोणावळ्यात नववर्ष स्वागत यात्रा उत्साहात

लोणावळ्यात नववर्ष स्वागत यात्रा उत्साहात

लोणावळा, ता. २२ ः लोणावळा शहर व ग्रामीण परिसर हिंदू समितीच्या वतीने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर लोणावळ्यात नववर्ष स्वागत यात्रा उत्साहात संपन्न झाली. लोणावळा शहर व ग्रामीण भागातील युवक, समाज मंडळे, सर्व राजकीय संघटना यांनी यासाठी पुढाकार घेतला. येथील पुरंदरे विद्यालय मैदान येथून फेरीस सुरूवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महावीर चौक, खंडाळा, गवळी वाडा, इंदिरानगर, तुंगार्ली, कैवल्यधाम, वलवण, वरसोली वाकसाई मार्गे तुकाराम महाराज पादुका स्थान येथे समारोप झाला. पारंपरिक वेशात सजलेल्या महिला, त्यांची बाईक फेरी, प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज यांची आकर्षक फुलांनी सजवलेली मूर्ती, अयोध्येत साकारण्यात येणाऱ्या राम मंदिराची साकारण्यात आलेली प्रतिकृती हे यंदाच्या स्वागत यात्रेचे वैशिष्ट्य होते. यावेळी नागरिकांनी फुलांची उधळण केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com