भुयारी गटार योजना अंतिम टप्प्यात 

लोणावळा नगरपरिषद ः बारा कोटींचा खर्च, काम पूर्ण करण्याच्या कंत्राटदारास सूचना

भुयारी गटार योजना अंतिम टप्प्यात लोणावळा नगरपरिषद ः बारा कोटींचा खर्च, काम पूर्ण करण्याच्या कंत्राटदारास सूचना

लोणावळा, ता. २९ ः लोणावळा नगरपरिषद हद्दीत सुमारे १२ कोटी रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या सुधारित भुयारी गटाराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी पंडित पाटील आदींनी कामाची पाहणी करत काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारास दिल्या. उपमुख्यधिकारी भगवान खाडे, माजी नगरसेवक ललित सिसोदिया, राजू शर्मा, आशिष बुटाला, पाणीपुरवठा अभियंता यशवंत मुंडे हे यावेळी उपस्थित होते. जाधव व पुजारी यांच्या कार्यकाळात तीन वर्षांपूर्वी सुधारित भुयारी गटार योजनेच्या कामास सुरवात झाली. या कामांतर्गत डोंगरगाव येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारण्यात आला आहे. सध्या या योजनेचे काम पूर्णत्वास आले असून, उर्वरित कामे युद्धपातळीवर सुरु आहे. नगरपरिषद हद्दीतील मुख्य बाजारपेठ, गावठाण, सिद्धार्थनगर, वर्धमान सोसायटी, निसर्ग नगरी, कैलासनगर, हनुमान टेकडी, संपूर्ण भांगरवाडी परिसर आदी प्रभागातून सर्व गटारीतले पाणी भुयारी गटारामधून डोंगरगाव येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात जाणार आहे. तिथे गेल्यावर खराब पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी गार्डन व बांधकाम क्षेत्रात वापरण्यात येणार आहे. सध्या सुरु असलेल्या भुयारी गटाराच्या उर्वरित कामामुळे स्थानिक बाजारभागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. बाजारपेठ भागातील कामाची जाधव व पुजारी यांनी मुख्याधिकाऱ्यांसमवेत पाहणी करत काम पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदारास दिल्या.


इंद्रायणीचे प्रदूषण कमी होणार

या योजनेमुळे यावर्षीपासून इंद्रायणी नदीमध्ये ड्रेनेज गटाराचे सांडपाणी थेट जाणार नाही. त्यामुळे इंद्रायणी नदीचे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात राष्ट्रीय पातळीवर लोणावळा नगरपरिषदेचा गौरव होत असताना सांडपाणी प्रक्रिया केंद्राअभावी लोणावळ्याला कमी गुण मिळाल्याने क्रमांक हुकला होता. प्रकल्प पूर्ण होत असल्याने अधिक चांगली कामगिरी करण्याची संधी आहे, अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व श्रीधर पुजारी यांनी दिली.


छायाचित्र ः 02443

लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या भुयारी गटार योजनेची माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी पंडित पाटील आदींनी पाहणी करत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com