खासदार बारणे यांच्याकडून 
‘ब्लॅक स्पॉट’ची पाहणी

खासदार बारणे यांच्याकडून ‘ब्लॅक स्पॉट’ची पाहणी

लोणावळा, ता. ७ : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाढते अपघात व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देत खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून द्रुतगती मार्गावरील ‘ब्लॅक स्पॉट’ची पाहणी करण्यात आली.
वाहतूक विभागाचे उपअभियंता तानाजी चिखले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यशवंत घोटकर, रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता सुर्ती नाईक सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनराज दराडे, कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे, आयआरबीचे जयंत डांगरे, तहसीलदार विक्रम देशमुख, लोणावळा मुख्याधिकारी पंडित पाटील, सूर्यकांत वाघमारे, सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी, शरद हुलावळे, राजेश खांडभोर, नीलेश तरस, दत्ता केदारी, विशाल हुलावळे, मुन्ना मोरे, नितीन देशमुख सुनील तावरे आदी उपस्थित होते.
बारणे म्हणाले, ‘‘लेन कटिंग संदर्भात कारवाई करावी, वाहतूक विभागाच्या पोलिसांनी रस्त्यावर उभे राहून संचलन करावे. येत्या आठ दिवसांत दिशादर्शक फलक, बॅरिकेट्स, रस्ते दुरुस्त कराव्यात,’’ अशी सूचना शिवसेना खासदार, केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष श्रीरंग बारणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सातत्याने अपघात होत असल्याने खासदार बारणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर महामार्गावरील ‘ब्लॅक स्पॉट’, खंडाळा येथील रस्त्याची अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. अवजड वाहने जाऊ नयेत यासाठी बूम बॅरिअर बसविले आहेत. यापुढे टोलनाक्यापासून जड वाहने आणि पर्यटन गाड्यांना लेन कटिंग करू देऊ नये. वाहतूक विभागाच्या पोलिसांनी रस्त्यावर उभे राहून संचलन करावे. जेणेकरून वाहनचालकांना शिस्त लागेल. अर्धवट कामे येत्या आठ दिवसात पूर्ण करण्यात यावी. दिशादर्शक फलक, बॅरिकेट्स, रस्ते दुरुस्त करावेत.
टनेलमध्ये विजेची सोय नाही. तिथे वीज दिवे बसवावेत. वाहतूक करणाऱ्या ट्रकने लेन कटिंग केल्यास दंड आकारण्यात यावा. घाटात अधिकचे कर्मचारी वाढवावेत. ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित केले आहेत. त्या जागेवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्याचे खासदार बारणे म्हणाले.

LON23B02519/02520

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com