
‘पद्मश्री डॉ. मणिभाई राष्ट्रसेवा’ने संतोष सरदेशमुख सन्मानित
लोणावळा, ता. १२ ः येथील संतोष सरदेशमुख यांना ‘पद्मश्री डॉ. मणिभाई राष्ट्रसेवा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. मॅगसेसे पुरस्कार प्राप्त पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात निस्पृहपणे योगदान देऊन उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
लोणावळ्यातील संतोष सरदेशमुख हे सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रासह पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुणे येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर येथे प्रतिष्ठानचे डॉ. राजेंद्र भोळे यांच्या हस्ते सरदेशमुख यांचा सन्मान झाला. लोकस्वातंत्र्य पत्रकार अखिल भारतीय महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख, लेवा पाटीदार संघ पिंपरी चिंचवड अध्यक्ष निनाभाऊ खर्चे, भातृ मंडळ बुलढाणाचे सचिव डी. के. देशमुख सचिव, सुभाष कट्यारमल, नितीन बोंडे, यतीन डाके, श्याम पाटील, अमोल पाटील, डॉ. अंकुश पवार, डॉ. उज्वला राठी उपस्थित होते.
छायाचित्रः LON23B02524