मावळात विकास कामांचा धडाका

मावळात विकास कामांचा धडाका

लोणावळा, ता. १९ : खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून मावळ तालुक्यात तीन कोटी रुपयांची विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
मावळातील साते, कान्हे, कामशेत, टाकवे, कार्ला, मळवली, पाटण येथील गावांमध्ये विकास कामांचे भूमिपूजन खासदार बारणे यांच्याहस्ते करण्यात आले. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, पंचायत समितीचे माजी सभापती गुलाब म्हाळसकर, अंकुश देशमुख, सुनील हगवणे, प्रवीण चव्हाण, सुनील मोरे, विशाल हुलावळे, दीपक हुलावळे, सागर हुलावळे, धनंजय नवघणे, गिरीश सातकर, डॅा. विकेश मुथा, दत्ता केदारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे. डी. पाटील, साते गावच्या सरपंच आरती आगळमे, कान्हेचे सरपंच विजय सातकर, टाकवेचे सरपंच राकेश ढमाले, मळवलीचे सरपंच अस्लम शेख, पाटणचे सरपंच प्रवीण तिकोने, कामशेतचे उपसरपंच दत्ता रावते आदींच्या उपस्थितीत हे कार्यक्रम पार पडले.
या वेळी खासदार बारणे म्हणाले, गावपातळीवर राजकारणविरहित कामे केली जात आहेत. गावातील विकासामध्ये राजकारण आणले जात नाही. सरपंच कोणत्या पक्षाचा आहे, हे बघितले जात नाही. सर्व गावांना विकासासाठी समान निधी दिला जात आहे. गावाच्या विकासाला अधिक चालना ग्रामपंचायतीमधील सर्वांनी राजकारणापेक्षा एकत्र येऊन गावाचा विकास करण्यावर भर द्यावा. गावपातळीवर राजकारण विरहित काम करावे, असे आवाहन खासदार बारणे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com