एकलव्य फाउंडेशनतर्फे
होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया

एकलव्य फाउंडेशनतर्फे होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया

लोणावळा, ता. १९ ः एकलव्य फाउंडेशन आणि सीएफटीआय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्रचिकित्सा शिबिरात ५६ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
देवघर येथील भैरवनाथ मंदिरात आयोजित मोफत नेत्र चिकित्सा व चष्मे वाटप शिबिरात ५०० नागरिकांची तपासणी करण्यात आली. यातील ५६ रुग्णांवर पनवेल येथील शंकरा आय हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. राजेश खंडेलवाल, ओंकार परांजपे, एकलव्य फाउंडेशनचे प्रवीण देशमुख, ओंकार पवार, विकास धोत्रे, विजय देशमुख, अजय सुरवडकर आदींनी या शिबिराचे संयोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com