बंगल्याबाहेरचे वृक्ष तोडणे पडले महागात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंगल्याबाहेरचे वृक्ष तोडणे पडले महागात
बंगल्याबाहेरचे वृक्ष तोडणे पडले महागात

बंगल्याबाहेरचे वृक्ष तोडणे पडले महागात

sakal_logo
By

लोणावळा, ता. २० ः नांगरगाव येथे आपल्या खासगी बंगल्याच्या आवारातील सात वृक्षांची विनापरवाना बेकायदा तोडल्याची मालकाला महागात पडले हे. नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या ठिकाणी सात झाडे तोडण्यात आली असल्याचा बाब पुढे आली असून, बंगला मालकाविरोधात विनापरवाना वृक्षतोडीप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. दरम्यान, ही वृक्षतोड करीत असताना एक मोठा वृक्ष बंगल्यालगत महावितरणच्या तारांवर कोसळल्याने वीज पुरवठाही खंडित झाला होता.
पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी व पर्यावरणाचा समतोल वृक्षतोड थांबणे अत्यंत गरजेचे आहे. नवीन वृक्षारोपण करण्यासोबतच वृक्षतोड रोखण्याकडेही विशेष लक्ष दिले गेले पाहिजे. अत्यावश्यक कारणासाठी जरी एखादे झाड तोडणे गरजेचे असले अथवा वृक्ष छाटणी करावयाची असेल तरी त्यासाठी नगरपरिषदेकडे मागणी केल्यानंतर नियमांच्या आधारे परवानगी दिली जाते. मात्र शुक्रवारी नांगरगाव येथील प्लाॅट क्रमांक ३ मधील नारायण कुटी या बंगल्यात पाच फूट उंचीवरील सात झाडे विनापरवानगी तोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये सप्तपर्णी, सोनचाफा, जांभूळ आदी वृक्षांचा समावेश आहे. वृक्षतोडीचा प्रकार समोर आल्याने नागरिकांनी याठिकाणी गर्दी केली. एक झाड महावितरणच्या वीजवाहक तारांवर कोसळल्याने काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. यानंतर महावितरणच्या कर्मचारी, नगरपरिषदेचे उद्यान निरीक्षक शिवाजीराव मेमाणे, कर्मचारी मंगेश कदम यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
काही कारणासाठी झाडे तोडायची असल्यास नगरपरिषदेची परवानगी घेण्याची गरज आहे, मात्र याठिकाणी झाडे तोडताना कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. झाडे तोडण्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येत असून नगरपरिषदेच्या वतीने लोणावळा पोलिसांकडे शुक्रवारीच तक्रार देण्यात आली असल्याची प्रतिक्रिया नगरपरिषदेचे उद्यान निरीक्षक व कर अधिकारी शिवाजीराव मेमाणे यांनी दिली.


छायाचित्रः LON23B02542/02543
लोणावळाः नांगरगाव येथील एका खासगी बंगल्याच्या आवारातील विनापरवानगी वृक्षतोड झाल्याची बाब पुढे आली आहे