द्रुतगती मार्गावर 
मोटार जळून खाक

द्रुतगती मार्गावर मोटार जळून खाक

लोणावळा, ता. २० : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ शनिवारी (ता. २०) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मोटारीने अचानक पेट घेतला. या घटनेत मोटार जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ किलोमीटर ४१ वर शनिवारी दुपारी मोटारीला अचानक आग लागली. चालकासह प्रवासी प्रसंगावधान दाखवीत गाडीच्या बाहेर पडल्याने कसलीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच आयआरबीचे कर्मचारी, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत मोटार जळून खाक झाली. या घटनेमुळे द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली. इंजिन गरम होऊन ही आग लागली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

छायाचित्र: LON23B02549/02550

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com