‘संत निरंकारी चॅरिटेबल’तर्फे सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘संत निरंकारी चॅरिटेबल’तर्फे
सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश
‘संत निरंकारी चॅरिटेबल’तर्फे सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश

‘संत निरंकारी चॅरिटेबल’तर्फे सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश

sakal_logo
By

लोणावळा, ता. ६ ः संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनद्वारे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत लोणावळा आणि खंडाळ्यात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण अभियान करीत स्वच्छता,आरोग्य, पर्यावरण संवर्धनासह प्रदूषण मुक्तीचा संदेश देण्यात आला. मिशनच्या वतीने लोणावळा, खंडाळा येथे निरंकारी सद्‍गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या पावन आशीर्वादाने वैश्विक प्रदूषण व ग्लोबल वार्मिंगच्या संकटापासून जगाला वाचवण्यासाठी संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनमार्फत संयुक्त राष्ट्रांची थीम ‘बीट प्लास्टिक पोल्युशन’ या विषयाला अनुसरून विश्व पर्यावरण दिवस’ दिनाचे औचित्य साधत स्वच्छता अभियान राबविण्यात आले, संत निरंकारी मिशनचे सुमारे दोन हजार अनुयायी तसेच स्वयंस्फूर्तीने सेवा करणारे सदस्य स्वच्छता अभियानात सहभागी झाले.

पुणेच्या झोन माध्यमातून लोणावळा, खंडाळा येथील मुंबई-पुणे महामार्गाच्या दोन्ही बाजूचे रस्ते, खंडाळा ते अमृतांजन पॉइंट,वलवन तळे, कावेरी फार्म, नागरगाव, लोहगड उद्यान, रायवूड ते लोणावळा डॅम गेट, आयएनएस ते भुशी, तुंगार्ली चौक ते ग्रामीण पोलिस स्टेशन, नगरपरिषद कार्यालय, मावळा पुतळा येथे स्वछता अभियान झाले. रायवूड पार्कमध्ये शंभर वृक्षांची लागवडही करण्यात आली. मिशनच्या युवा स्वयंसेवकांनी बीट प्लास्टिक प्रदूषण थीमवर लघू नाटिका,
पथनाट्य, पोस्टर्सच्या माध्यमातून प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश देत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पृथ्वीवर सध्या ग्लोबल वॉर्मिंगचे संकट आहे. अशा वेळी पर्यावरण संकटाविषयी नागरिकांना जागृत होण्याची प्रेरणा देण्याचा संत निरंकारी मशिनचा प्रयत्न आहे. वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम तसेच प्रदूषण मुक्तीसाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे, असे आवाहन संत निरंकारी मंडळाचे पुणे झोन प्रभारी ताराचंद करमचंदानी यांनी केले.
छायाचित्रः Lon23B02564/02565
लोणावळाः जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत संत निरंकारी मिशनच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता अभियान राबविले